शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

साताऱ्याच्या तरुणाईला आता ‘झुंबा’नं याड लावल

By admin | Updated: July 8, 2016 01:07 IST

नृत्य अन् एरोबिक्सचे मिश्रण : कोलंबियातील नृत्याला महाविद्यालयीन युवकांनी केलं आपलंसंं

 सचिन काकडे-सातारा  -उत्तम आरोग्यासाठी व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी जिम शिवाय पर्याय नाही. मात्र, सध्या आरोग्य उत्तम ठेवणाऱ्या ‘झुंबा’ नृत्याने साताऱ्यातील आबालवृद्धांना ‘याड’ लावलं आहे. नृत्य आणि एरोबिक्सचे मिश्रण करून तयार करण्यात आलेला ‘झुंबा’ आता पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरानंतर प्रथमच साताऱ्यात सुरू झाला आहे.‘झुंबा’ही कोलंबीयातील अ‍ॅल्बट्रो पेरेज यांची देण आहे. त्यांनीच १९९० मध्ये हा नृत्य प्रकार सुरू केला. ‘झुंबा’ला आरोग्याच्या दृष्टीने अल्पावधीतच महत्त्व प्राप्त झाले. यानंतर हा नृत्य प्रकार संपूर्ण जगात विस्तारला गेला व तीतकाच लोकप्रियही झाला.आजपर्यंत याचे प्रशिक्षण केवळ मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्येच उपलब्ध होते. मात्र, पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून साताऱ्यात प्रथमच ‘झुंबा’ डान्स प्रकार सुरू झाला असून, तरुणाईमध्ये विशेषत: युवतींमध्ये याची क्रेज वाढत चालली आहे. महाविद्यालयीन तरुणींचा ओढा या नृत्यप्रकाराकडे वाढत आहे.याबाबत माहिती देताना साताऱ्यातील पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमीचे संचालक व सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक पंकज चव्हाण म्हणाले, ‘आजपर्यंत केवळ मोठ्या शहरात शिकविला जाणारा हा नृत्य प्रकार आता साताऱ्यातही सुरू झाला आहे. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झालेल्या या नृत्य प्रकाराची तरुणांमध्ये क्रेज असली तरी युवतींचा याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. झुंबा एरोबिक्स नृत्य प्रकार असल्यामुळे यातून व्यायामासह डान्सही करता येतो. जिल्ह्यात कुठेही हा प्रकार पाहावयास मिळत नाही. आरोग्यवर्धक नृत्य प्रकार असल्याने हा डान्स करण्यासाठी वयाचे कसलेच बंधन नाही.’ झुंबा म्हणजे काय?नृत्य, एरोबिक्स आणि संगीत अशा त्रिवेणी संगमातून झुंबा डान्सची निर्मिती झाली आहे. या डान्स प्रकारात केवळ डान्सच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम प्रकारही शिकवले जातात. ‘झुंबा’त अनेक डान्स प्रकार आहेत. पाण्यामध्येही हा डान्स प्रकार केला जातो. त्याच्या स्टेप्सही वेगवेगळ्या आहेत. झुंबा करीत असताना संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. हा डान्स पाच वर्षांच्या मुलापासून ते अगदी ७० वर्षांपर्यंतच्या व्यक्तीही करू शकतात.असे आहेत प्रकार..पाण्यात केला जाणारा अ‍ॅक्वा झुंबा, वजन हातात घेऊन केला जाणारा झुंबा, स्टेप बोर्डवर केला जाणारा झुंबा, असे झुंबाचे विविध प्रकार आहेत. स्ट्रेचिंग, बेंडिंग असे विविध शारीरिक व्यायामांनी युक्त अशा स्टेप्स या नृत्य प्रकाराद्वारे केल्या जातात. आज धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशा लोकांसाठी झुंबा नृत्य वरदान ठरत आहे. झुंबा म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ‘नृत्यासोबत व्यायाम’. साताऱ्यात बेसिक कोर्स शिकविले जात असला तरी भविष्यात शहरात याचे सेंटर सुरू करण्याचा मानस आहे. उत्तम आरोग्यासाठी झुंबा करणे गरजेचे आहे.- पंंकज चव्हाण, नृत्य दिग्दर्शकअसेही फायदे :झुंबा डान्स विशिष्ट अशा संगीतावर केला जातो. एक तास झुंबा केल्यास शरीरातील सुमारे ५०० कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. जिममध्ये शरीरातील काही अवयवांचा तर झुंबामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.संगीताच्या तालावर शिकविल्या जाणाऱ्या झुंबामुळे शरीर सुडौल राहते.रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारतेशरीरातील अतिरिक्त चरबीही कमी होऊन वजन कमी होण्यासही मदत होते.ह्रदयाचे ठोके सुधारतात.