शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

मला धक्के देण्याची सवय; कधी दुसऱ्याला बसतो तर कधी मलाच : उदयनराजे भोसले

By जयदीप दाभोळकर | Published: January 08, 2021 2:53 PM

इतरांची जशी स्टाईल असते तशी आपलीही आहे, असं कॉलर उडवण्याच्या प्रश्नावर बोलताना उदयनराजे म्हणाले.

ठळक मुद्देउदयनराजे भोसले यांनी अचानक केलं ग्रेड सेपरेटरचं उद्धाटनकधी राजकारण केलं नाही, लोकांचं हित डोळ्यासमोर ठेवून समाजकारण केलं, उदनराजेंचं वक्तव्य

भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज अचानक साताऱ्यातील पोवई नाका येथील ग्रेड सेपरेटरचं उद्घाटन करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला धक्के देण्याची सवय असल्याचं म्हटलं. "कधी कधी मी हे धक्के देतो आणि कधी हे धक्के मलाही बसतात," असं ते आपल्या स्टाईलमध्ये म्हणाले. "मला धक्के देण्याची सवय आहे. कधी दुसऱ्याला बसतो कधी मला स्वत:ला बसतो. 'आदत से मजबूर' म्हणतात तसं आहे. जुन्या सवयी जात नाहीत. मी राजकारण कधी केलं नाही. ते मला जमणारही नाही. मी आजवर समाजकारण केलं. तेही लोकांचं हित नजरेसमोर ठेवून केलं. तेच लक्षात ठेवून माझी पुढील वाटचालही असणार आहे," असं उदयनराजे म्हणाले. यावेळी त्यांना हा रस्ता सर्वसामान्यांसाठी कधी खुला केला जाणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी हिंदी चित्रपटातील एक डायलॉग मारत 'अभी के अभी' असं म्हटलं. खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांनी ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनादरम्यानही आपली कॉलर उडवली होती. यासंदर्भातही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. "इतरांची जशी एक स्टाईल असते तशी आपलीही आहे. आपल्याला कोणी शाबासकी देवो अगर नको. स्वत:ला शाबासकी देण्याचा अधिकार मलाही आहे आणि ती आपली पद्धत आहे," असं उदयनराजे म्हणाले. आजपासून ग्रेड सेपरेटरचा मार्ग सर्वांसाठी खुला होणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण