शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP Election Results 2026: कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे जोरदार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 18:18 IST

खासदार नितीन पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार रामराजे नाईक निंबाळकर व मंत्री मकरंद पाटील यांनी एकत्र येत राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा आणण्यासाठी रणनीती आखली

साहिल शहाकोरेगाव : कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. जिल्हा परिषदेच्या सहापैकी तीन जागा जिंकत तर पंचायत समितीमध्ये बारापैकी तब्बल नऊ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्याच्या राजकारणात ठळक मुसंडी मारली आहे. २०१९ नंतर महायुतीकडे झुकलेला कोरेगाव तालुका पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे वळल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विचारांना मतदारांनी विजयाच्या रूपाने मान्यता दिली आहे.दक्षिण-उत्तर सुमारे ऐंशी किलोमीटरपर्यंत विस्तारलेल्या कोरेगाव तालुका हा कोरेगाव-कराड उत्तर व फलटण-कोरेगाव असे तीन विधानसभा मतदारसंघ आणि सातारा व माढा लोकसभा मतदारसंघामध्येही विभागलेला आहे. त्यामुळे दोन खासदार व चार आमदारांचे राजकीय वर्चस्व या तालुक्यावर कायम राहिले आहे. जरंडेश्वर शुगर मिल्सच्या माध्यमातून अजितदादा पवार यांनी तालुक्यात लक्ष घातल्यानंतर राष्ट्रवादीची ताकद वाढली होती, मात्र २०१९ नंतर चित्र बदलले होते. २०२४ मध्ये महायुतीने सातारा लोकसभा तसेच कोरेगाव व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला होता, तर माढा लोकसभा व फलटण-कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रतिनिधी विजयी झाले होते.या निवडणुकीत पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी आमदार महेश शिंदे यांनी मोठी बांधणी केली होती. त्यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार मनोज घोरपडे यांची साथ मिळाली. दुसरीकडे खासदार नितीन पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार रामराजे नाईक निंबाळकर व मंत्री मकरंद पाटील यांनी एकत्र येत राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा आणण्यासाठी रणनीती आखली. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यामुळे पाटील बंधूंचे राजकीय वजन या निवडणुकीत निर्णायक ठरले.पिंपोडे बुद्रुक गटात फेरमतमोजणीनंतर भाजपचे अमित चव्हाण विजयी ठरले, कुमठे गटात देखील शिवसेनेचे हणमंतराव जगदाळे विजयी झाले. तर वाठार स्टेशन गटात राष्ट्रवादीच्या जयश्री भोसले यांनी यश मिळवले. एकंबे व वाठार किरोली गटातही राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचा सर्वाधिक फटका भाजप व शिंदेसेनेला बसल्याचे चित्र आहे.एकाही मोठ्या नेत्याची जाहीर सभा न होता देखील राष्ट्रवादीने मिळवलेला हा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फलित असल्याचे खासदार नितीन पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याने आगामी राजकीय समीकरणांकडे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : NCP's Strong Comeback in Koregaon Taluka in Satara ZP Elections

Web Summary : Nationalist Congress Party (NCP) regained dominance in Koregaon, winning three of six Zilla Parishad seats and nine of twelve Panchayat Samiti seats. Voters favored Ajit Pawar's ideology, shifting from the Mahayuti alliance. United NCP leaders strategically countered BJP and Shinde's Shiv Sena, marking a significant political resurgence.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Satara areaसातारा परिसरpanchayat samitiपंचायत समितीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारShashikant Shindeशशिकांत शिंदेBalasaheb Patilबाळासाहेब पाटील