Satara ZP Election Results 2026: ग्रामविकास मंत्र्यांच्या भावजय, चुलतबंधूंचा पराभव; शिंदेसेना आमदारांची पत्नी भाजपच्या चिन्हावर विजयी

By हणमंत पाटील | Updated: February 9, 2026 16:56 IST2026-02-09T16:54:49+5:302026-02-09T16:56:09+5:30

येळगाव गटाने वाढवली उत्कंठा...

Satara ZP Election Results 2026 Minister Jayakumar Gore's cousin and brother-in-law defeated in Satara Shinde Sena MLA Mahesh Shinde's wife and won on BJP symbol | Satara ZP Election Results 2026: ग्रामविकास मंत्र्यांच्या भावजय, चुलतबंधूंचा पराभव; शिंदेसेना आमदारांची पत्नी भाजपच्या चिन्हावर विजयी

Satara ZP Election Results 2026: ग्रामविकास मंत्र्यांच्या भावजय, चुलतबंधूंचा पराभव; शिंदेसेना आमदारांची पत्नी भाजपच्या चिन्हावर विजयी

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधक ठरलेल्या लढतींमध्ये धक्कादायक निकाल लागले. कुक्कुडवाड गटामध्ये अनिल राष्ट्रवादी (अजित पवार)चे अनिल देसाई ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे चुलतबंधू अरूण गोरे यांचा पराभव केला तर मनीषा योगेश फडतरे राष्ट्रवादी (अजित पवार)  यांनी मंत्री गोरे यांच्या भावजय भारतीताई अंकुश गोरे यांचा पराभव केला. मात्र,  आंधळी गटातून दुसऱ्या भावजयी भाजपाच्या सोनल शेखर गोरे विजयी झाल्या आहेत. तसेच शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी व भाजपच्या उमेदवार खटाव गटातून विजयी झाल्या आहेत.

सातारा जिल्ह्यात शिरवळ, खटाव, कुकुडवाड, येळगाव, मंद्रुळकोळे, कातरखटाव गटामध्ये होणाऱ्या लढतींकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. यामध्ये खटाव तालुक्यातील कातरखटावमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार)चे अभयसिंह जगताप यांचा भाजपच्या धनंजय चव्हाण यांनी तर सुरज पाटील (भाजप) यांनी सुरेंद्र गुदगे यांचा धक्कादायक पराभव केला. खटावमध्ये भाजपाच्या उमेदवार प्रिया महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी (अजित पवार)चे उमेदवार राहूल पाटील यांचा पराभव केला.

कुकुडवाड गटात जयकुमार गोरे यांचे चुलतबंधू अरूण गोरे आणि राष्ट्रवादी (अजित पवार)चे अनिल देसाई यांच्यात काँटे की टक्कर झाली. यामध्ये अनिल देसाई यांनी बाजी मारली. शिरवळ गटामध्ये माजी अध्यक्ष उदय कबुले आणि जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांच्यात लढत झाली. ही लढत राष्ट्रवादी (अजित पवार)चे उदय कबुले यांनी जिंकली.
भाजपचे माजी आमदार मदन भोसले यांच्या कन्या सुरभी भोसले यांनी भूईंज गणातून विजय मिळवत प्रथमच पंचायत समितीत प्रवेश केला आहे.

येळगाव गटाने वाढवली उत्कंठा...

माजी मंत्री विलासराव उंडाळकर यांचे पुत्र ॲड. उदयसिंह पाटील आणि पुतण्या ॲड. आनंदराव पाटील यांच्यात येळगाव गटामध्ये अटीतटीची लढत झाली. यामध्ये सुरुवातील उदयसिंह पाटील यांनी आघाडी घेतली आहे.

Web Title : सतारा जेडपी चुनाव: मंत्री के रिश्तेदार हारे, शिंदे सेना विधायक की पत्नी जीती

Web Summary : सतारा जेडपी चुनाव में चौंकाने वाले नतीजे आए। कुक्कड़वाड़ में मंत्री के रिश्तेदार हारे। मनीषा योगेश फड़तरे ने मंत्री गोरे की भाभी को हराया। खटाव से शिंदे सेना विधायक की पत्नी बीजेपी टिकट पर जीतीं।

Web Title : Satara ZP Election: Minister's Relatives Lose, Shinde Sena MLA's Wife Wins

Web Summary : Satara ZP election saw surprising results. Minister's relatives lost in Kukkudwad and Manisha Yogesh Fadatre defeated Minister Gore's sister-in-law. Shinde Sena MLA's wife won on BJP ticket from Khatav.