शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP Election Results 2026: महाबळेश्वर तालुक्यात महायुतीत फिफ्टी-फिफ्टी सत्तेचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 18:07 IST

भिलारवर घड्याळाचा गजर तर तळदेववर धनुष्यबाण

दिलीप पाडळेपाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकांनी तालुक्याचे राजकीय चित्र स्पष्ट केले आहे. भिलार गट व त्याअंतर्गत भिलार आणि मेटगुताड गणांमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) च्या घड्याळाचा गजर घुमला आहे. तर पश्चिम विभागातील तळदेव गट तसेच तळदेव व कुंभरोशी गणांवर शिंदेसेनेने धनुष्यबाणाचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिंदेसेना या दोन्ही पक्षांनी परस्परांशीच लढत देत तालुक्यात फिफ्टी-फिफ्टी सत्ता वाटणी साध्य केल्याचे चित्र समोर आले आहे.पूर्व भागातील भिलार गटावर राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक पुन्हा एकदा प्रभावीपणे वाजली. जिल्हा परिषद भिलार गटातून राष्ट्रवादीचे संजय केळगणे यांनी ८७८८ मते मिळवत प्रतिस्पर्ध्यावर ६०९३ मतांचे मोठे मताधिक्य घेतले. भिलार गणातून वंदना भिलारे यांनी ५१३४ मते मिळवून ४१४४ मतांनी दणदणीत विजय संपादन केला. मेटगुताड गणात शकुंतला चोरमले यांनी २७८४ मते घेत १०८६ मतांचे मताधिक्य मिळवत राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला.याउलट तालुक्याच्या पश्चिम भागात शिंदेसेनेच्या धनुष्यबाणाने अचूक निशाणा साधत तळदेव गट पूर्णतः ताब्यात घेतला. तळदेव गटातून शिंदेसेनेचे अजित संकपाळ यांनी ७६७३ मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर ३००० मतांचे भक्कम मताधिक्य घेतले. तळदेव गणात संजय शेलार यांनी ४२८२ मते मिळवून प्रतिस्पर्ध्याला २०१० धोबीपछाड दिला. कुंभरोशी गणात संजय मोरे यांनी २७७२ मते घेत ३३४ मतांनी निसटता पण महत्त्वपूर्ण विजय मिळवला.महाबळेश्वर तालुक्यावर स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत पश्चिम भागात शिवसेनेने तळदेव गट आणि कुंभरोशी गण ताब्यात घेतले होते, मात्र तळदेव गण राष्ट्रवादीकडे राहिला होता. या पंचवार्षिक निवडणुकीत शिंदेसेनेने तोही जिंकून संपूर्ण तळदेव गटावर आपला झेंडा रोवला आहे.दरम्यान, तालुक्याच्या पूर्व विभागातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपने सर्वस्व पणाला लावले होते. ऐन निवडणूक काळात अनेक पक्षप्रवेश घडवून आणत लढत चुरशीची होईल, असे वातावरण निर्माण करण्यात आले. मात्र जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी प्रभावी संघटन व स्थानिक ताकदीच्या जोरावर भिलार गटावर राष्ट्रवादीचे वर्चस्व अबाधित ठेवत आपली पकड सिद्ध करून दाखवली.विजयाची पुनरावृत्ती  निवडणूक काळात भाजपने भिलार गटात आक्रमक भूमिका घेत रणशिंग फुंकले होते. मात्र संघटनात्मक कमकुवतपणाचा फटका बसत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आपल्या घड्याळाची टिकटिक वाजवत विजयाची पुनरावृत्ती केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP Election: Mahayuti shares power fifty-fifty in Mahabaleshwar.

Web Summary : In Mahabaleshwar, NCP (Ajit Pawar) and Shinde Sena secured equal power in the Satara Zilla Parishad elections. NCP dominated Bhilar, while Shinde Sena won in Taldev.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानpanchayat samitiपंचायत समितीMahayutiमहायुतीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस