Satara ZP Election Results 2026: साताऱ्यात भाजपची जोरदार मुसंडी; पण, मंत्री जयकुमार गोरे यांना बसला धक्का

By नितीन काळेल | Updated: February 9, 2026 16:35 IST2026-02-09T15:58:07+5:302026-02-09T16:35:18+5:30

महाविकास आघाडीला मोठा धक्का

Satara ZP Election Results 2026 BJP leads in 32 seats in Satara Zilla Parishad elections Minister Jayakumar Gore suffers setback in Maan taluka | Satara ZP Election Results 2026: साताऱ्यात भाजपची जोरदार मुसंडी; पण, मंत्री जयकुमार गोरे यांना बसला धक्का

Satara ZP Election Results 2026: साताऱ्यात भाजपची जोरदार मुसंडी; पण, मंत्री जयकुमार गोरे यांना बसला धक्का

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने ३२ जागांवर आघाडी घेतली असल्याने सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. पण, ३३ जागा जिंकल्यासच मिनीमंत्रालयावर पक्षाचा झेंडा फडकणार आहे. अन्यथा राष्ट्रवादी काॅंग्रेस किंवा शिंदेसेनेची मदत भाजपला घ्यावी लागेल. तर माण तालुक्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना धक्का बसला आहे. पाचपैकी दोन गटच ताब्यात घेता आले आहेत. तसेच जिल्ह्यातील या निवडणुकीत भाजपने प्रथमच मुसंडीही मारल्याचे दिसून आले आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि ११ तालुक्यांतील पंचायत समितीच्या १३० गणांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. माणमधील एका गणाची बिनविरोध निवड झालेली. त्यामुळे ६५ गट आणि १२९ गणांसाठी शनिवारी निवडणूक झाली. यामध्ये ६७.८० टक्के मतदान झालेले. तर सोमवारी सकाळपासून मतमोजणी सुरू झाली. प्रत्येक तालुक्यात मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. सुरूवातीपासूनच भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून आले. 

पण, दुपारपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार भाजपने काही ठिकाणी विजय मिळवला होता. तर कोठे आघाडीवर होती. त्यामुळे भाजपचा आकडा ३२ वर पोहोचला होता. तर राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेनेही दुहेरी आकडा गाठलेला. पण, अंतिम निकाल हाती आल्याशिवाय सत्ता भाजपच्या ताब्यात जाणार की त्यांना इतर पक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागणार हे स्पष्ट झालेले नव्हते. तरीही या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारुन एकहाती सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले.

दरम्यान, पंचायत समिती निवडणुकीतही संमिश्र स्थिती दिसून आली. काही गटात आणि गणातही विविध पक्षांचे उमेदवार निवडूण आले. तर कोठे एक गट आणि त्याअंतर्गत गण एकाच पक्षाकडेही राहिल्याचे स्पष्ट झाले. असे असलेतरी जिल्ह्यात महायुतीतीलच पक्ष सत्तेत बसणार हेही दिसून आलेले आहे. महाविकास आघाडीला फारसा थारा मिळालेला नाही. पण, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचा फायदाही दिसून आला. 

Web Title : सतारा ZP चुनाव में बीजेपी को बढ़त; मंत्री गोरे को झटका

Web Summary : सतारा ZP चुनाव में बीजेपी आगे, सत्ता का लक्ष्य। मंत्री गोरे को मान में झटका। बीजेपी को महत्वपूर्ण लाभ, गठबंधन समर्थन की आवश्यकता। पंचायत समिति चुनावों में मिश्रित परिणाम; महायुति सरकार बनाने की संभावना।

Web Title : BJP Gains in Satara ZP Polls; Minister Gore Faces Setback

Web Summary : BJP leads in Satara ZP elections, aiming for power. Minister Gore faced a setback in Man. BJP made significant gains, needing coalition support. Mixed results in Panchayat Samiti polls; MahaYuti likely to govern.