सातारा : यवतेश्वर येथे अल्पवयीन मुलीची घरफोडी, ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:49 AM2018-10-10T11:49:46+5:302018-10-10T11:59:41+5:30

यवतेश्वर येथील घरातून अल्पवयीन मुलीने घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख असा एकूण ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Satara: A young girl's burglary at Yateshwar, worth Rs 83 thousand | सातारा : यवतेश्वर येथे अल्पवयीन मुलीची घरफोडी, ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

सातारा : यवतेश्वर येथे अल्पवयीन मुलीची घरफोडी, ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

ठळक मुद्देयवतेश्वर येथे अल्पवयीन मुलीची घरफोडी ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

सातारा : यवतेश्वर येथील घरातून अल्पवयीन मुलीने घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख असा एकूण ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मनीषा राजेंद्र पवार (वय ४१, रा. यवतेश्वर, ता. सातारा) यांच्या घरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी राहत होती. तिने २९ सप्टेंबर रोजी दुपारी बारा ते पाचच्या दरम्यान घरातील कपाट फोडले.

कपाटातील ८० हजार रुपये किमतीचे चार तोळ््यांचे दागिने व तीन हजार रोख असा एकूण ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप ती मिळून न आल्याने मनीषा पवार यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Web Title: Satara: A young girl's burglary at Yateshwar, worth Rs 83 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.