शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

सातारा : रस्त्यातील खड्डे मुजविण्यासाठी चक्क काळी माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 1:18 PM

राज्यात सर्वाधिक अवजड वाहतूक होत असलेल्या सातारा-लोणंद राज्यमार्गावरील पावसाळ्यात पडलेले मोठमोठे खड्डे मुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आता रस्त्याकडेला असलेल्या काळ्या मातीचा वापर केला जात आहे. यामुळे या रस्त्याची आता माती झाली आहे.

ठळक मुद्देरस्त्यातील खड्डे मुजविण्यासाठी चक्क काळी माती, नागरिकांत संताप सातारा-लोणंद राज्यमार्गावर बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याची करामत

वाठार स्टेशन : राज्यात सर्वाधिक अवजड वाहतूक होत असलेल्या सातारा-लोणंद राज्यमार्गावरील पावसाळ्यात पडलेले मोठमोठे खड्डे मुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आता रस्त्याकडेला असलेल्या काळ्या मातीचा वापर केला जात आहे. यामुळे या रस्त्याची आता माती झाली आहे.सातारा-लोणंद पुणे, सातारा-फलटण-बारामती अहमदनगर अशी सर्वाधिक अवजड वाहतूक होत असलेला टोल फ्री रस्ता पावसाळ्यापूर्वीच खड्ड्यात गेला होता. त्यानंतर सलग नव्वद दिवस पडलेल्या पावसाने असणारा रस्त्याही खड्ड्यात गेला. संपूर्ण रस्ताच सध्या धूळखात पडला आहे. या रस्त्यावर प्रवास करणे म्हणजे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण दिल्यासारखेच आहे.

या रस्त्यावर दुचाकी चालवणं ही आता एक प्रकारची शिक्षा समजली जात आहे. अनेकांनी आता या रस्त्याला कंटाळून पर्यायी मार्ग वापरण्याचाच मार्ग निवडला आहे. त्यातच वाढत्या पेट्रोल-डिझेलमुळे तर या रस्त्यावरील प्रवास अधिकच महाग झाला आहे.

रस्त्यावर पडलेले खड्डे ही या रस्त्याची पहिली समस्या नाही. या रस्त्यावर प्रवास मालवाहतूक करताना कोणत्याही प्रकारचा टोल लागत नाही. क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेली वाहतूकही सोयीस्कररित्या होत असल्याने अनेकांनी या रस्त्याचा मार्ग निवडला आहे.

एक तर या रस्त्यावर सुरू असलेली अवजड वाहतूक बंद करावी किंवा या रस्त्याची देखभाल दुरुस्तीसाठी खासगी कंपनीकडे देऊन या कंपनीला टोल आकारण्याची परवानगी द्यावी. या रस्त्यावर टोल नाका सुरू झाला तर या रस्त्यावर सुरु असलेली निमी अवजड वाहतूक कमी होईल व या रस्त्याचे तसेच या रस्त्यावरील असलेल्या नदीवरील पुलाचे आयुष्यमान वाढेल अन्यथा सध्याचा आरळे पूल सावित्री पूल झाल्याशिवाय राहणार नाही, अश्ी भीती वाहनचालक व्यक्त करत आहे. 

या रस्त्यावर असलेली अवजड वाहतूक विचारात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात माती भरण्यापेक्षा चांगल्या पध्दतीने खडी डांबर भरून हे काम करावे.- दत्तात्रय भोईटे,माजी सरपंच तडवळे

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSatara areaसातारा परिसर