शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सातारा : नादुरुस्त एसटीमुळे बामणोलीचा प्रवास असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 1:23 PM

सातारा तालुक्यातील दुर्गम बामणोली, कास, गोगवे येथे राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातून एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत. बामणोली परिसरातून असंख्य प्रवासी, विद्यार्थी एसटीने साताऱ्याला प्रवास करतात; परंतु या परिसरात नादुरुस्त गाड्या सोडल्या जात असल्याने प्रवाशांचे हाल होतात.

ठळक मुद्दे नादुरुस्त एसटीमुळे बामणोलीचा प्रवास असुरक्षितनाल्यात गाडी गेल्याने घाबरगुंडी

बामणोली (सातारा) : सातारा तालुक्यातील दुर्गम बामणोली, कास, गोगवे येथे राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातून एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत. बामणोली परिसरातून असंख्य प्रवासी, विद्यार्थी एसटीने साताऱ्याला प्रवास करतात; परंतु या परिसरात नादुरुस्त गाड्या सोडल्या जात असल्याने प्रवाशांचे हाल होतात.साताऱ्याच्या पश्चिम भागात असलेल्या काम, बामणोलीत जीवनाश्यक सुविधाही नसल्याने तेथील लोकांना साताऱ्यात दररोज यावे लागते. महाविद्यालयीन तरुणांना एसटीशिवाय पर्यायही नाही.या मार्गावर सध्या अनेक खराब व नादुरुस्त गाड्या सोडल्या जात आहेत. त्या मध्येच घाटात वळणावर बंद पडत आहेत. त्यामुळे गाडी सुरू होई किंवा पर्यायी सोय होईपर्यंत प्रवासी व विद्यार्थ्यांना मध्येच बसून राहावे लागत आहे.

शाळांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी व प्रवासी यांना एसटी म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशा एसटीचा प्रवास धोकादायक वाटू लागला आहे. या मार्गावरील घाट, वेडीवाकडी वळणे याचा विचार करून सातारा आगाराने या मार्गावर चांगल्या गाड्या सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.नाल्यात गाडी गेल्याने घाबरगुंडीगोगवेहून साताऱ्यला जाणारी एसटी बामणोलीजवळील धोकादायक वळणावर बुधवारी नाल्यात गेली. त्यामुळे एसटीतील विद्यार्थी व प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. सर्वांनी एसटीतून उतरून पायी चालत जाणे पसंत केले.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळSatara areaसातारा परिसर