सातारा : पसरणीचा घाट.. वणव्यात खाक, विघ्नसंतोषी व्यक्तींकडून वणवे लावण्याचे प्रकार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 17:27 IST2018-02-13T17:14:37+5:302018-02-13T17:27:04+5:30
वाई-पाचगणीला जोडणाऱ्या पसरणी घाटात विघ्नसंतोषी व्यक्तींकडून वणवे लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. सोमवारी लागलेल्या वणव्यात घाटातील वृक्षसंपदा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली. या वणव्यामुुळे पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.

सातारा : पसरणीचा घाट.. वणव्यात खाक, विघ्नसंतोषी व्यक्तींकडून वणवे लावण्याचे प्रकार सुरू
वाई : वाई-पाचगणीला जोडणाऱ्या पसरणी घाटात विघ्नसंतोषी व्यक्तींकडून वणवे लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. सोमवारी लागलेल्या वणव्यात घाटातील वृक्षसंपदा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली. या वणव्यामुुळे पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.
वाईहून पाचगणी व महाबळेश्वरला जाण्यासाठी पसरणी घाटातूनच जावे लागते. या मार्गावरून कोकणाकडे जात येत असल्याने घाटातून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. जैवविविधतेने नटलेल्या या घाटात अनेक दुर्मीळ वृक्ष व पशुपक्ष्यांचा अधिवास आहे. मात्र, विघ्नसंतोषी व्यक्तींमुळे वृक्षसंपदा व पक्ष्यांच्या अधिवासावर कृत्रिम संकट निर्माण झाले आहे.
घाटात वणवे लावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. सोमवारी घाटात लावण्यात आलेल्या वणव्यात गवत तसेच शेकडो वृक्ष जळून खाक झाले. तसेच पक्ष्यांची घरटीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. वनविभागाने वणवे लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच डोंगरात अत्यावश्यक ठिकाणी जाळ पट्टे तयार करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.