पसरणी घाटात होतेय राजरोसपणे वृक्षांची कत्तल

By Admin | Published: June 24, 2017 03:23 PM2017-06-24T15:23:47+5:302017-06-24T15:23:47+5:30

संबंधित विभागाने दखल न घेतल्यास अनेक वृक्षांची होणार बिमोड

Shedding of trees in the spreading Ghat | पसरणी घाटात होतेय राजरोसपणे वृक्षांची कत्तल

पसरणी घाटात होतेय राजरोसपणे वृक्षांची कत्तल

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत

वाई , दि. २४ : वाईच्या पश्चिम भागासह परिसरातील डोंगरावरील झाडे व जंगले ही संरक्षित आहेत़ यामध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांचा व पक्ष्यांचा अधिवास आहे़ अशा ठिकाणची वृक्षतोड झाल्यास या प्राणी व पक्ष्यांचा संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो़ वाई शहरापासून जवळ असलेल्या पसरणी घाटात मुख्य रस्त्याच्या बाजूला अनेक झाडांची कत्तल झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ या घटनेची संबंधित विभाग हा नेहमीच डोळेझाक करत असल्याने वृक्षप्रेमी व स्थानिक नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे़

वाई-पाचगणी रोडवरील पसरणी घाटात रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी आहे़ ही झाडांची हिरवाई पर्यटकांसह स्थनिकांना भुरळ पाडत असते़ या परिसरात अनेक प्राणी यामध्ये काळवीट, ससे, कोल्हे, रानडुकरे, मुंगस, सायळ, पक्ष्यांमध्ये मोर, गरुड, घार, कोकीळ विविध प्रकारचे पक्षी तसेच अनेक सरपटणारे जीव वास्तव्यास आहेत़ अशा प्रकारचे राजरोसपणे झांडाची कत्तल होत राहिल्यास जंगली जिवांचा अधिवास धोक्यात येत आहे़ झाडांची कत्तल करणाऱ्या विघ्नसंतोषी लोकांनी झाडे ही अध्यार्तून तोडून नेली आहेत़ तरी संबंधित विभागाने पाहणी करून दोषींना कडक कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेंमीमधून जोर धरू लागली आहे़



वृक्षतोड रोखण्यास वनविभाग अपयशी...


या परिसरात असे वृक्षतोडीचे प्रकार वारंवार घडत आहेत़ पसरणी घाटात सामाजिक संस्था पर्यावरणपे्रमींकडून वृक्षारोपण करून वर्षभर संवर्धन करण्याचे काम करत आहेत़ परंतु संबंधित वनविभागाला पसरणी घाटातील वारंवार घडणारे वृक्षतोडीचे प्रकार रोखण्यात अपयश आले आहे़ ही दुदैर्वी बाब असून, असे प्रकार करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक संस्था व स्थानिकांमधून जोर धरू लागली आहे़

Web Title: Shedding of trees in the spreading Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.