शहरं
Join us  
Trending Stories
1
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
2
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
3
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
4
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला
5
अबब! ही तर फक्त सुरुवात...पारा आणखी 3 ते 4 अंशांनी वाढणार, IMDचा इशारा
6
बापरे एवढी बेरोजगारी! IIT च्या ७००० विद्यार्थ्यांना नोकरी मिळेना; मुंबई, दिल्लीचे माजी विद्यार्थांना साकडे
7
फ्लाइटला ८ तास उशीर, क्रू नसल्याने विमानच उडालं नाही! अक्षया नाईक संतापली, म्हणाली- "लहान मुलं, वयोवृद्ध माणसं..."
8
'या' ३१ जागांवर 'अबकी बार ४०० पार'चं भवितव्य; UP मध्ये भाजपाचा खेळ बिघडणार?
9
Video: पती घरी येताच पत्नीने लाथाबुक्क्यांनी सुरु केली मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल
10
“स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब, खरे गांधीवादी असते तर...”; रोहित पवारांची अण्णा हजारेंवर टीका
11
"संविधान धर्माच्या नावावर आरक्षण देत नाही, मुस्लिम आरक्षण संपवणार", अमित शाह स्पष्टच बोलले
12
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
13
Rajnath Singh : चांदीचा मुकुट घालताच राजनाथ सिंह म्हणाले, "हा विकून गरिबाच्या मुलीसाठी पैंजण बनवा"
14
हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ? पत्नी नताशासोबत दुरावा, अभिनेत्रीने केलं असं काही.... 
15
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
16
"RCB तून बाहेर पड आणि दिल्लीकडून खेळ मग...", दिग्गजाचा Virat Kohli ला सल्ला!
17
बांग्लादेशी खासदाराची कोलकात्यात निर्घृण हत्या; जवळच्या मित्रानेच दिली 5 कोटींची सुपारी
18
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
19
CSK ला हरवलं म्हणजे IPL ट्रॉफी जिंकली, असं होत नाही; माजी खेळाडूचा RCB ला टोमणा
20
'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच

सातारा : टोमॅटो बागांचा खर्च बळीराजाच्या अंगावर, लाल पिकाचे दर गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 1:49 PM

कवडीमोल किमतीने विकले जात असल्याने खटाव तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटो न तोडताच तशाच बाग ठिकठिकाणी उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत.

ठळक मुद्देटोमॅटो बागांचा खर्च बळीराजाच्या अंगावर, दर गडगडले खटाव तालुक्यात ठिकठिकाणी बागा आहे तशाच

खटाव (सातारा) : शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेती व्यवसाय अडचणीत येत आहे. त्यातच खटाव तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या बागा केल्या आहेत. परंतु सध्या बाजारपेठेत टोमॅटो कवडीमोल किमतीने विकले जात असल्याने शेतकऱ्यांनी याकरिता घातलेला खर्च तर सोडाच, या बागांचा खर्च त्यांच्या अंगावर पडला आहे. त्यामुळे टोमॅटो न तोडताच तशाच बाग ठिकठिकाणी उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत.टोमॅटोचा वापर सर्रास स्वयंपाक घरामध्ये होत असतो. या लाल पिकाला बाजारात मिळत असलेल्या दरामुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्याचबरोबर या बागामध्ये तोडणीकरिता मजूर लावून अधिकच घाट्यात जाणार आहेत. त्यामुळे टोमॅटो न तोडता तशाच या बागा उभ्या असल्याचे ठिकठिकाणी दिसून येत आहे.सध्या किरकोळ बाजारात याला दहा रुपये किलोचा दर मिळत आहे. या मिळणाऱ्या दरातून टोमॅटोच्या बागा उभ्या करताना लागणाऱ्या रोपापासून इतर साहित्याचा होणारा खर्च वजा करता शेतकऱ्याच्या हाती काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यानी टोमॅटो न तोडता तशाच ठेवल्यामुळे या बागामध्ये टोमॅटोचा खच पडलेला पाहावयास मिळत आहे.ज्या पिकातून काही आर्थिक उत्पन्न मिळेल, या आशेवर टोमॅटोच्या पिकाकडे वळलेला शेतकरी आता आर्थिक संकटात आला आहे. बाजारात सध्या याला मिळणारा दर आणि या पिकासाठी होत असलेला लागणीपासून तोडणीपर्यंत होणारा खर्च यांचा कुठेच ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर