Satara: पाटण तालुक्यातील नवजा येथील प्रसिद्ध ओझर्डे धबधबा प्रवाहित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 05:33 AM2023-06-25T05:33:43+5:302023-06-25T05:34:08+5:30

Satara: निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या कोयना भागातील नवजा येथील प्रसिद्ध ओझर्डे धबधबा सह्याद्रीच्या कडेकपारीतून फेसाळत वाहू लागला आहे. इतरही छोटे-छोटे धबधबे काही दिवसांत प्रवाहित होतील.

Satara: The famous Ozarde waterfall flows from Navja in Patan taluk | Satara: पाटण तालुक्यातील नवजा येथील प्रसिद्ध ओझर्डे धबधबा प्रवाहित

Satara: पाटण तालुक्यातील नवजा येथील प्रसिद्ध ओझर्डे धबधबा प्रवाहित

googlenewsNext

-निलेश साळुंखे

 कोयनानगर - निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या कोयना भागातील नवजा येथील प्रसिद्ध ओझर्डे धबधबा सह्याद्रीच्या कडेकपारीतून फेसाळत वाहू लागला आहे. इतरही छोटे-छोटे धबधबे काही दिवसांत प्रवाहित होतील. दोन वर्षांपूर्वी भूस्खलन व अगोदर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांविना ओस पडलेला कोयना भाग पुन्हा वर्षासहलीने बहरला तर निसर्गप्रेमी व हौशी पर्यटकांवर अवलंबून असलेल्या येथील शेकडो लहान-मोठ्या व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोयना भागात जून महिन्याच्या अखेरीस हलक्या, मध्यम सरींसह पावसाचे आगमन झाले आहे. सदाहरित असलेल्या डोंगरकपारीसह परिसरात गर्द हिरवळीचा गालिचावर दाट धुक्याची दुलई अन् पावसाच्या सरी अशा आल्हाददायक वातावरणात सह्याद्रीच्या रांगांमधून पाटणच्या पश्चिमेकडील कुंभार्ली घाटापर्यंत सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून वाहणाऱ्या जलधारा पावसाळ्यात पर्यटकाना खुणावत असतात. जैवविविधतेने नटलेला समृद्ध निसर्ग व महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण, नेहरू गार्डन व शिवसागर जलाशयाचे छोट्या-छोट्या खोऱ्यांतून विस्तारलेले पाणलोट क्षेत्र पर्यटकांचे आकर्षण ठरत असून कोयनेच्या वर्षापर्यटनाचा केंद्रबिंदू असलेला ओझर्डे धबधबा प्रवाहित झाल्याने हौशी पर्यटकांची पावले तिकडे वळू लागली आहेत.

ओझर्डे धबधब्याचा उगम असलेला डोंगरमाथ्यावर पावसाचा जोर असल्याने धबधबाचा प्रवाह काही प्रमाणात सुरू झाला असून तीनपैकी एक मोठी धार कोसळू लागली आहे.

दोन वर्षांपूर्वी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व भूस्खलनाने ओझर्डे धबधब्याचा परिसर सुशोभित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच बहुतांश भाग वाहून गेला होता. तद्नंतर पर्यटकानी पाठ फिरवली होती व त्याअगोदर दोन वर्षे कोरोनाच्या काळात प्रवेशबंदी असल्याने स्थानिक लहान-मोठ्या व्यावसायिकांना फटका बसला होता.

ओझर्डे धबधबा
-उगमस्थान तोरणे गाव
- धबधब्याची धार ३०० फूट
- समुद्रसपाटीपासून ७५० मीटर उंची
- उगमस्थानापासून धबधबा कोयना धरणात मिसळतो ते अंतर सहा कि.मी. आहे.
 
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून पाण्याची आवक सुरू झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात अल्पशा वाढ झाली आहे. सध्या धरणात १०.७५ टीएमसी पाणीसाठा आहे. गत २४ तासांत पडलेला पाऊस कोयना ४९. एकूण १४० मिलीमीटर, नवजा ४४/१६० मिलिमीटर, महाबळेश्वर ८७/२०८ मिलिमीटर.
फोटो

Web Title: Satara: The famous Ozarde waterfall flows from Navja in Patan taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.