सातारा :  बिअरच्या बाटलीने एकास मारहाण, गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 12:54 IST2018-09-26T12:52:02+5:302018-09-26T12:54:55+5:30

उसाच्या गुऱ्हाळावरून एकाने चिडून बिअरच्या बाटलीने मारहाण केली. यात दिशान इकबाल आत्तार (वय २९, रा. माचीपेठ, सातारा) हा गंभीर जखमी झाला.

Satara: Suicide bitten by beer bottle, severe injuries | सातारा :  बिअरच्या बाटलीने एकास मारहाण, गंभीर जखमी

सातारा :  बिअरच्या बाटलीने एकास मारहाण, गंभीर जखमी

ठळक मुद्दे  बिअरच्या बाटलीने एकास मारहाण, गंभीर जखमी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा

सातारा : उसाच्या गुऱ्हाळावरून एकाने चिडून बिअरच्या बाटलीने मारहाण केली. यात दिशान इकबाल आत्तार (वय २९, रा. माचीपेठ, सातारा) हा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, दिशान आत्तार याचा राजवाडा परिसरात उसाच्या रसाच्या गुऱ्हाळाचा व्यवसाय आहे. काही महिन्यांपूर्वी राजेश माळी (रा. यादोगोपाळ पेठ) याला विरोध दर्शवून गुऱ्हाळ टाकू दिले नाही म्हणून वादावादी झाली होती.

दिशान आत्तार मित्रासोबत मंगळवारी रात्री नऊ वाजण्यासाठी सांबरवाडी, ता. सातारा येथे जेवण करण्यासाठी गेला होता. दरम्यान, राजेश माळी त्या ठिकाणी आला. त्याने दिशानला धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर संतापाने राजेशने जमिनीवर पडलेली बिअरची मोकळी बाटली उचलली.

ती दगडावर फोडून दिशानवर बाटलीने वार केले. यात दिशानच्या छाती व पाठीवर गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत दिशानला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Satara: Suicide bitten by beer bottle, severe injuries