सातारा : शिवेंद्रसिंहराजे गटाला विकासकामातून उत्तर देऊ : उदयनराजे भोसले यांचा खणखणीत इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 13:37 IST2018-04-23T13:36:26+5:302018-04-23T13:37:57+5:30
सातारा विकास आघाडी जाहीरनाम्यानुसारचं विकासकामे करीत आहे. नुसती आश्वासने देऊन आम्ही जनतेची फसवणूक करत नाही. चुल आमची, तवा आमचा अन् भाकरी खाणारा भलता असं म्हणणाऱ्यांना आम्ही विकासाकामांतूनच उत्तर देऊ, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटावर नाव न घेता लगावला.

सातारा : शिवेंद्रसिंहराजे गटाला विकासकामातून उत्तर देऊ : उदयनराजे भोसले यांचा खणखणीत इशारा
सातारा : सातारा विकास आघाडी जाहीरनाम्यानुसारचं विकासकामे करीत आहे. नुसती आश्वासने देऊन आम्ही जनतेची फसवणूक करत नाही. चुल आमची, तवा आमचा अन् भाकरी खाणारा भलता असं म्हणणाऱ्यांना आम्ही विकासाकामांतूनच उत्तर देऊ, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटावर नाव न घेता लगावला.
सातारा पालिकेच्या भुयारी गटर योजनेसह कोटेश्वर पुल आणि सुमित्राराजे उद्यान पुलाच्या रुंदीकरणाच्या कामांचा शुभारंभ उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास नगराध्यक्षा माधवी कदम, मुख्याधिकारी शंकर गोरे, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, नगरसेवक राजू भोसले, अल्लाउद्दीन शेख आदी उपस्थित होते.
खा. उदयनराजे म्हणाले, ह्यशहराची वाढती लोकसंख्या अन् भविष्यात होणारी हद्दवाढ याचा विचार करून पुढील चाळीस ते पन्नास वर्षांपर्यंत सातारकरांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी कास धरणाची उंची वाढविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.
गटारातून वाहनारे दुषित पाणी नद्यांमध्ये मिसळून जलप्रदूषण होते. हे टाळण्यासाठी भुयारी गटार योजना अंमलात आणून हे पाणी शुद्धीकरण करण्यात येणार आहे. आज पहिला टप्प्यातील कामाचा शुभारंभ झाला, याचा मनस्वी आनंद होत आहे.
या कामामुळे नागरिकांची थोडीफार गैरसोय होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता विकासकामांना साथ द्यावी. दरम्यान, भाकरी खाणारा भलता असं म्हणणाऱ्यांना आम्ही केवळ विकासाकामांतूनच उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.