शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

सातारा : लूटमार करणाऱ्यांना पाठलाग करून पकडले, किरकोळ बाचाबाचीतून घडला प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 2:02 PM

किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून प्रवाशांची काही रोकड आणि दागिने जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या दोघांना वाई आणि पाचगणी पोलिसांनी पाठलाग करून आनेवाडी टोलनाक्यावर पकडले. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देवाईहून पाचगणीकडे जाणाऱ्या दोन कारचालकांची बाचाबाची किरकोळ कारणावरून जबरदस्तीने हिसकावून घेतले प्रवाशांची रोकड आणि दागिने आनेवाडी टोलनाक्यावर संंबंधितांना पकडण्यात पोलिसांना यश

सातारा : किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून प्रवाशांची काही रोकड आणि दागिने जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या दोघांना वाई आणि पाचगणी पोलिसांनी पाठलाग करून आनेवाडी टोलनाक्यावर पकडले. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.वाईहून पाचगणीकडे जाणाऱ्या दोन कारचालकांची किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. त्यानंतर दुसऱ्या कारमधील दोघा प्रवाशांनी इतर प्रवाशांची रोकड आणि दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर संबंधित कार वाईहून साताऱ्याकडे निघाली. याची माहिती प्रवाशांनी पाचगणी पोलिसांना दिली.

त्यानंतर पाचगणी पोलिसांनी वाई पोलिसांच्या मदतीने संबंधितांचा पाठलाग सुरू केला. रात्री दहाच्या सुमारास आनेवाडी टोलनाक्यावर संंबंधितांना पकडण्यात पोलिसांना यश आले.

नेमक्या कोणत्या कारणातून संबंधितांनी प्रवाशांना लुटले? हे अद्याप समोर आले नसून, तक्रारदाराने तक्रार न दिल्यामुळे अद्याप या घटनेचा गुन्हा पाचगणी किंवा वाई पोलिस ठाण्यात नोंद झाला नव्हता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा