शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

सातारा : दगडी चाळीतला असल्याचे सांगत पोलिसांच्या अंगावर ओतले रॉकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 1:57 PM

जावळी तालुक्यातील आलेवाडी येथे एका गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मी दगडी चाळीतला आहे, असे सांगत त्यांच्या अंगावर चक्क रॉकेल ओतण्यात आले. तसेच शिवीगाळ करून पेटवून टाकण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी मेढा पोलिसांनी भिकाजी पवार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटकही केली आहे.

ठळक मुद्देदगडी चाळीतला असल्याचे सांगत पोलिसांच्या अंगावर ओतले रॉकेलशिवीगाळ करून पेटवून देण्याची धमकी, आलेवाडीतील एकजण अटकेत

मेढा/सातारा : जावळी तालुक्यातील आलेवाडी येथे एका गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मी दगडी चाळीतला आहे, असे सांगत त्यांच्या अंगावर चक्क रॉकेल ओतण्यात आले. तसेच शिवीगाळ करून पेटवूनटाकण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी मेढा पोलिसांनी भिकाजी पवार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटकही केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार, दि. २३ रोजी आलेवाडीत झालेल्या बैठकीत मंडळाच्या हिशेबावरून वाद झाला होता. त्या बैठकीत भिकाजी पवार याने एकावर ब्लेडने वार केले. त्याची दहशत असल्याने तक्रार करण्यासकोणीही पुढे येत नव्हते. ग्रामस्थांकडून याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस आलेवाडीमध्ये या घटनेचा मागोवा घेण्यासाठी गेले होते.

मेढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्यासह चार पोलीस कर्मचारी तपासासाठी येताच घरात बसलेल्या भिकाजी पवार याने मी दगडी चाळीतला आहे असे म्हणत घरातील रॉकेलने भरलेला कॅन थेट पोलिसांच्या अंगावर ओतून त्यांना पेटवून देण्याची धमकी दिली. तसेच त्याने शिवीगाळही केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, भिकाजी पवार याला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस