सातारा : खासगी बसमधून प्रवाशाची बॅग चोरली, चालक, वाहकावर पोलिसांत गुन्हा नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 15:14 IST2018-04-19T15:14:25+5:302018-04-19T15:14:25+5:30

ट्रॅव्हल्समध्ये बसलेल्या प्रवाशाची बॅग चोरून त्यातील ६६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी बसचालक व वाहकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Satara: A private bus stole a passenger bag, driver and driver on the vehicle | सातारा : खासगी बसमधून प्रवाशाची बॅग चोरली, चालक, वाहकावर पोलिसांत गुन्हा नोंद

सातारा : खासगी बसमधून प्रवाशाची बॅग चोरली, चालक, वाहकावर पोलिसांत गुन्हा नोंद

ठळक मुद्देखासगी बसमधून प्रवाशाची बॅग चोरलीचालक, वाहकावर पोलिसांत गुन्हा नोंद

सातारा : ट्रॅव्हल्समध्ये बसलेल्या प्रवाशाची बॅग चोरून त्यातील ६६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी बसचालक व वाहकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, परशुराम रवींद्र लोंढे (रा. हिंगणगाव, जि. सांगली) यांनी तक्रार दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, बुधवारी रात्री उशिरा सातारा बसस्थानक परिसरातील प्रशासकीय इमारत येथे जोतिर्लिंग ट्रॅव्हल्समध्ये ते बसले होते.

काही वेळानंतर ते खाली उतरले असता बसचालक नितीन राजेंद्र चव्हाण (वय २०, दौलतनगर, सातारा) व वाहक नीलेश कृष्णात सावंत (२७, मुढे, ता. पाटण) यांनी सीटवरील बॅगची चोरी केली.

यात सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, चैन असा एकूण ६५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल होता. तो त्यांनी लंपास केला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title: Satara: A private bus stole a passenger bag, driver and driver on the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.