शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

By admin | Updated: October 17, 2014 00:38 IST

विधानसभा निवडणूक : मतमोजणी ठिकाणे निश्चित

सातारा : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांचा नवीन आमदार कोण असेल, यावर रविवार, (दि. १९) दुपारी बारा वाजेपर्यंत शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मतमोजणी संपेपर्यंत मुख्यालय सोडू नये, असे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत. जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी (दि. १५) मतदान झाले. ८७ उमेदवार रिंगणात होते. मतदानाची एकूण टक्केवारी ६७.६४ इतकी राहिली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील लढत चौरंगी झाल्यामुळे निकाल काय असेल, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. आठ विधानसभा (पान मतदारसंघांची मतमोजणी निश्चित केलेल्या ठिकाणी होणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणी फेऱ्या किती असतील, याची निश्चिती मात्र अजून झाली नव्हती. शनिवार, दि. १८ रोजी दुपारपर्यंत फेऱ्या निश्चित होण्याबरोबरच किती टेबलची मांडणी असेल, याचा आराखडा तयार होईल, अशी माहिती निवडणूक शाखेतून देण्यात आली. रविवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. पहिल्यांदा एका टेबलवर पोस्टल मतांची मोजणी होणार आहे. याचा निकाल पहिल्या अर्ध्या तासातच अपेक्षित आहे.दरम्यान, बुधवारी सायंकाळी सहा वाजता मतदान संपल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रातून कडक बंदोबस्तात ‘ईव्हीएम’ मतमोजणी केंद्राकडे रवाना करण्यात आली. ज्या ठिकाणी ‘ईव्हीएम’ ठेवण्यात आली आहेत तेथे कडक सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात आली आहे. सीआरपीएफ, स्थानिक पोलीस आणि सीसीटीव्ही, अशी यंत्रणा येथे आहे. त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी येथे कर्मचारी नियुक्त केले आहेत. दररोज प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदारांनी मतमोजणी केंद्राला भेट देणे बंधनकारक केले आहे. (प्रतिनिधी)येथे होणार मतमोजणीफलटण : नवीन शासकीय गोदाम, शासकीय विश्रामगृहवाई : श्रीनिवास मंगल कार्यालय, एमआयडीसीकोरेगाव : वखार महामंडळ गोदाम, जळगावमाण : बाजार समिती गोदाम, दहिवडीकऱ्हाड दक्षिण : महाराष्ट्र वखार महामंडळ गोदाम नं. १कऱ्हाड उत्तर : शासकीय अन्नधान्यसाठा गोदामपाटण : संत निरंकारी भवन, म्हावशीसातारा : शाहू स्टेडियम, सातारा