शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

ड्रग्ज इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश, पाच जणांना अटक; सातारा डीबीची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 17:05 IST

५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा : साताऱ्यात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रग्ज इंजेक्शची चोरटी विक्री करणाऱ्या रॅकेटचा सातारा शहर डीबीने कारवाई पर्दाफाश केला. कारवाईत एकूण ५ आरोपींना अटक करून एकूण ५ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवराज पंकज कणसे (वय २४ रा. गोडोली, सातारा), साईकुमार महादेव बनसोडे (वय २५ रा. भोसे, ता. पंढरपूर), सुदीप संजय मेंगळे (वय १९ रा. सदरबझार, सातारा), अतुल विलास ठोंबरे (वय २० रा. शाहुपूरी सातारा), तय्यब हाफीस खान (वय २३ रा. गोरेगाव, मुंबई), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चारभिंती, सदरबझार परिसरामध्ये काही महिन्यांपासून नशेसाठी वापरण्यात येणारे ड्रग्ज इंजेक्शन आढळून आले होते. यानंतर शहर डी.बी. पथक करणाऱ्या युवकावर दोन महिन्यांपासून लक्ष ठेवून होते. परंतु, तो ओळख लपवून दक्षता बाळगत होता. परंतु डी. बी. पथकाने चिकाटीने गोपनीय माहिती मिळवून माल पुरविणाऱ्या युवकाची तसेच तांत्रिक माहिती मिळवली. तो दि. २ रोजी चारभिंती परिसरामध्ये माल विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजताच पोलिसांनी चारभिंती परिसरामध्ये सापळा रचला.चारभिंती परिसरामध्ये बंद टपरीच्या आडोशास संशयास्पदरीत्या वावरताना त्यास ताब्यात घेतले. त्याच्या गाडीची व त्याची झडती घेतली असता नशेसाठी वापरण्यात येणारे इंजेक्शनच्या ३० बाटल्या मिळून आल्या. त्याची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अटक करून अधिक चौकशी केली. त्याने हे इंजेक्शन मुंबईतील युवकाकडून खरेदी करून अन्य साथीदारांना थोड्या थोड्या प्रमाणात देवून सप्लाय करायचा व नशेबाज युवकांकडे चोरून पोहच करीत असल्याचे सांगितले.ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक श्याम काळे, पोलिस उपनिरीक्षक डी. एस. देवकर, सुधीर मोरे, नीलेश यादव, सुजीत भोसले, नीलेश जाधव, विक्रम माने, पो. ना. पंकज मोहिते, पो. कॉ, इरफान मुलाणी, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, सुहास कदम यांनी केली आहे.

माल पोहोच करताना सावधगिरीमाल पोहच करतानाही तो समाेर येत नव्हता. विश्वासू लोकांनाचा याची माहिती देत होता. सप्लाय करणाऱ्या तीन युवकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यापैकी एक जण शिकाऊ डॉक्टर असल्याचे निष्पन्न झाले. चारही युवकांना अटक करण्यात आलेली आहे.मुंबईत जेथून सप्लाय तेथील युवक ताब्यात मुंबईत जेथून सप्लाय होत होता, तेथील युवकासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून इंजेक्शनचा ३० बाटल्यांचा साठा मिळून आल्याने त्यास देखील ताब्यात घेवून अटक करण्यात आलेली आहे. याचाही तपास सुरू असून, एकूण ५ लाख १५ हजारांचा माल जप्त केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस