ड्रग्ज इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश, पाच जणांना अटक; सातारा डीबीची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 17:05 IST2025-05-10T17:04:58+5:302025-05-10T17:05:09+5:30

५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Satara Police take action against a racket involved in the illegal sale of drug injections used for intoxication | ड्रग्ज इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश, पाच जणांना अटक; सातारा डीबीची कारवाई 

ड्रग्ज इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश, पाच जणांना अटक; सातारा डीबीची कारवाई 

सातारा : साताऱ्यात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रग्ज इंजेक्शची चोरटी विक्री करणाऱ्या रॅकेटचा सातारा शहर डीबीने कारवाई पर्दाफाश केला. कारवाईत एकूण ५ आरोपींना अटक करून एकूण ५ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवराज पंकज कणसे (वय २४ रा. गोडोली, सातारा), साईकुमार महादेव बनसोडे (वय २५ रा. भोसे, ता. पंढरपूर), सुदीप संजय मेंगळे (वय १९ रा. सदरबझार, सातारा), अतुल विलास ठोंबरे (वय २० रा. शाहुपूरी सातारा), तय्यब हाफीस खान (वय २३ रा. गोरेगाव, मुंबई), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चारभिंती, सदरबझार परिसरामध्ये काही महिन्यांपासून नशेसाठी वापरण्यात येणारे ड्रग्ज इंजेक्शन आढळून आले होते. यानंतर शहर डी.बी. पथक करणाऱ्या युवकावर दोन महिन्यांपासून लक्ष ठेवून होते. परंतु, तो ओळख लपवून दक्षता बाळगत होता. परंतु डी. बी. पथकाने चिकाटीने गोपनीय माहिती मिळवून माल पुरविणाऱ्या युवकाची तसेच तांत्रिक माहिती मिळवली. तो दि. २ रोजी चारभिंती परिसरामध्ये माल विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजताच पोलिसांनी चारभिंती परिसरामध्ये सापळा रचला.

चारभिंती परिसरामध्ये बंद टपरीच्या आडोशास संशयास्पदरीत्या वावरताना त्यास ताब्यात घेतले. त्याच्या गाडीची व त्याची झडती घेतली असता नशेसाठी वापरण्यात येणारे इंजेक्शनच्या ३० बाटल्या मिळून आल्या. त्याची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अटक करून अधिक चौकशी केली. त्याने हे इंजेक्शन मुंबईतील युवकाकडून खरेदी करून अन्य साथीदारांना थोड्या थोड्या प्रमाणात देवून सप्लाय करायचा व नशेबाज युवकांकडे चोरून पोहच करीत असल्याचे सांगितले.

ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक श्याम काळे, पोलिस उपनिरीक्षक डी. एस. देवकर, सुधीर मोरे, नीलेश यादव, सुजीत भोसले, नीलेश जाधव, विक्रम माने, पो. ना. पंकज मोहिते, पो. कॉ, इरफान मुलाणी, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, सुहास कदम यांनी केली आहे.

माल पोहोच करताना सावधगिरी

माल पोहच करतानाही तो समाेर येत नव्हता. विश्वासू लोकांनाचा याची माहिती देत होता. सप्लाय करणाऱ्या तीन युवकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यापैकी एक जण शिकाऊ डॉक्टर असल्याचे निष्पन्न झाले. चारही युवकांना अटक करण्यात आलेली आहे.

मुंबईत जेथून सप्लाय तेथील युवक ताब्यात 

मुंबईत जेथून सप्लाय होत होता, तेथील युवकासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून इंजेक्शनचा ३० बाटल्यांचा साठा मिळून आल्याने त्यास देखील ताब्यात घेवून अटक करण्यात आलेली आहे. याचाही तपास सुरू असून, एकूण ५ लाख १५ हजारांचा माल जप्त केला आहे.

Web Title: Satara Police take action against a racket involved in the illegal sale of drug injections used for intoxication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.