शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : पंचायत सर्व सभापती राष्ट्रवादीचेच !

By admin | Updated: September 15, 2014 00:02 IST

पंचायत समिती निवडी : काँग्रेस, शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी दोन उपसभापती

सातारा : पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडीत राष्ट्रवादीने पुन्हा एकदा बाजी मारली असून, जिल्ह्यातील सर्वच्या सर्व अकरा पंचायत समितींच्या सभापतिपदी आणि सहा ठिकाणी उपसभापतिपदी राष्ट्रवादीचे सदस्य विराजमान झाले आहेत. पाटण आणि खंडाळ्यात मात्र शिवसेनेचे उपसभापती झाले आहेत. काँग्रेसच्या वाट्याला कोरेगाव, माण उपसभापतिपद आले आहे. कऱ्हाडमध्ये उपसभापतिपदावर ‘काका काँग्रेस’ने बाजी मारली.सातारा जिल्ह्यात कऱ्हाड, फलटण, कोरेगाव, जावळी, माण, सातारा, खंडाळा, वाई, महाबळेश्वर, खटाव आणि पाटण अशा अकरा पंचायत समिती आहेत. फलटण, वाई, महाबळेश्वर, खटाव आणि सातारा पंचायत समितीत ‘सबकुछ राष्ट्रवादी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माण, कऱ्हाड पंचायत समितीत यावेळी बदल घडेल, अशी परिस्थिती होती. मात्र, कऱ्हाडमध्ये ‘जैसे थे’ परिस्थिती राहिली आहे. माण पंचायत समिती निवडीवेळी काँग्रेसचे सदस्य शेखर गोरे यांच्या अनुपस्थितीमुळे राष्ट्रवादीला सभापतिपदाची लॉटरी लागली. गोरेंच्या अनुपस्थितीमुळे राष्ट्रवादीला उपसभापतिपदावरही संधी होती. मात्र, येथे राष्ट्रवादीच्या सदस्यानेच काँग्रेसच्या पारड्यात मत टाकल्यामुळे उपसभापती काँग्रेसचा झाला. कोरेगावात चिठ्ठीनेच बदल घडविला. येथे सभापती राष्ट्रवादीचा तर उपसभापती काँग्रेसचा झाला. पाटणमध्येही चिठ्ठीद्वारेच निवडी झाल्या. साताऱ्यात अपेक्षेप्रमाणे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाच्या कविता चव्हाण सभापती तर खासदार उदयनराजे समर्थक सूर्यकांत पडवळ उपसभापती झाले. वाई आणि फलटण दोन्ही पदांवर ‘महिलाराज’ आहे. वाईमध्ये आ. मकरंद पाटील यांनी बाजी मारली तर फलटणमध्ये रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पुन्हा एकदा ‘किंगमेकर’ची भूमिका बजावली आहे. खंडाळ्यात येथे राष्ट्रवादीचा सभापती तर शिवसेनेचा उपसभापती झाला आहे.सकाळी प्रवेश... दुपारी उपसभापतीजावळी पंचायत समितीच्या निवडी धक्कादायक आहेत. राष्ट्रवादीच्याच उमेदवाराचा पराभव करून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आणि नंतर ‘राष्ट्रवादीमय’ झालेल्या सुहास गिरी यांना सभापती केले आहे. काँग्रेसच्या एकमेव सदस्य असलेल्या निर्मला कासुर्डे यांनी सकाळी राष्ट्रवादीत प्रवेश करत उपसभापतिपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली आहे.