शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

सातारा : संविधान जाळले तरी नरेंद्र मोदी बोलेनात : फौजिया खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:01 AM

मोदी सरकारच्या काळामध्ये देशात लोकशाही व संविधान या दोन्ही गोष्टींना धोका निर्माण झाला आहे. संविधान बदलण्यासाठी आपण सत्तेवर आलो, असं भाजपचे नेते सांगत आहेत. जंतरमंतर येथे देशद्रोह्यांनी संविधानाची प्रत जाळली तरी नरेंद्र मोदी आपल्या मन की बातमध्ये काही बोलले नाहीत

ठळक मुद्दे३ आॅक्टोबर रोजी पुण्यात संविधान बचाव कार्यक्रमप्रतिकात्मक मनु:स्मृतीचे दहन

 सातारा : ‘मोदी सरकारच्या काळामध्ये देशात लोकशाही व संविधान या दोन्ही गोष्टींना धोका निर्माण झाला आहे. संविधान बदलण्यासाठी आपण सत्तेवर आलो, असं भाजपचे नेते सांगत आहेत. जंतरमंतर येथे देशद्रोह्यांनी संविधानाची प्रत जाळली तरी नरेंद्र मोदी आपल्या मन की बातमध्ये काही बोलले नाहीत. मोदींच्या काळात संविधानाला धक्का पोहोचविणारे देशद्रोही मोकाट फिरत आहेत,’ अशी टीका राष्ट्रवादी काँगे्रसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी केली.

राष्ट्रवादी भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आमदार विद्याताई चव्हाण, राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई ठाकरे, छाया जंगले, आशाताई भिसे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, सुरेखाताई पाटील, कविता म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

फौजिया खान म्हणाल्या, ‘आपल्या देशात सध्या जे लोक सरकारच्या भूमिकेबद्दल बोलतात, त्यांचा आवाज दाबला जातो, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, अथवा त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कॉ. एस. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्यासारख्या विचारवंतांच्या हत्या झाल्या. या गुन्ह्यातील आरोपी मोकाट फिरत आहेत.’

देशात सर्वात असुरक्षित महिला आहेत, हे स्पष्ट करताना खान म्हणाले, ‘भाजपचे मंत्री अत्याचार करणाऱ्यांची बाजू घेतात. भाजपचे आमदार राम कदम मुलींना उचलून नेण्याची भाषा वापरतात.’निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन वापरावर बंदी घालून पूर्वीसारखी मतदान प्रक्रिया राबविण्याची राष्ट्रवादीची मागणी आहे. या मशीन नको म्हणून निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे १७ पक्षांनी तक्रारी केल्या आहेत. भारत, नायजेरिया आणि काही छोटे देश सोडले तर जगात कुठेही ईव्हीएम मशीनचा वापर केला जात नाही. आपल्याच देशात या मशीन वापरासाठी हट्ट केला जातो.

दरम्यान, ३ आॅक्टोबर रोजी पुणे येथे संविधान बचाव कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, आ. अजित पवार, आ. दिलीप वळसे-पाटील हे उपस्थित राहणार आहेत. २६ जानेवारी रोजी मुंबईतून संविधान बचाव चळवळीला राष्ट्रवादीने सुरुवात केली. ९ आॅक्टोबर रोजी औरंगाबादला संविधान बचाव कार्यक्रम घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी भवनात महिला पदाधिकाºयांची बैठक घेऊन फौजिया खान, आ. विद्याताई चव्हाण यांनी संविधान बचाव कार्यक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी जिल्ह्णातून एक हजार महिला सहभागी होतील, असे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी सांगितले. यावेळी कºहाड तालुकाध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, प्रदेश सरचिटणीस राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, लीना गोरे, राजलक्ष्मी नाईक आदींची उपस्थिती होती.प्रतिकात्मक मनु:स्मृतीचे दहनसंविधान बचाव, देश बचाव, इव्हीएम मशीन हटाव, अशा घोषणा देत राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे साताºयात मनु:स्मृतीच्या प्रतिकृतीचे दहन केले. ‘संविधान की शान में राष्ट्रवादी मैदान में, भाजप हटाओ...देश बचाओ, संविधान बचाओ..देश बचाओ, इव्हीएम हटाव लोकशाही बचाओ....’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेस