सातारकरांनो काटकसरीने करा पाण्याचा वापर, ‘कास’च्या पाणीपुरवठ्यात आजपासून कपात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:11 IST2025-05-07T16:11:00+5:302025-05-07T16:11:16+5:30
सातारा : उन्हाळ्यात निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी सातारा पालिकेने कास योजनेच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार, ...

सातारकरांनो काटकसरीने करा पाण्याचा वापर, ‘कास’च्या पाणीपुरवठ्यात आजपासून कपात!
सातारा : उन्हाळ्यात निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी सातारा पालिकेने कास योजनेच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार, दि. ७ मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून, कास योजनेवरील संबंधित पेठांचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवला जाणार आहे.
सातारा शहराला कास व शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पालिकेकडून कास धरणाची उंची वाढविण्यात आल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात पाचपट वाढ झाली आहे. तरीदेखील प्रशासनाकडून ऐन उन्हाळ्यात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आल्याने याची नागरिकांना झळ सहन करावी लागणार आहे.
पाणीपुरवठा विभागाकडून पाणीकपातीचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित पेठांचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवला जाणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना पावसाळा सुरू होईपर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.
असे आहे कपातीचे वेळापत्रक
- सोमवार : शुक्रवार पेठ, गडकर आळी
- मंगळवार : बोगदा परिसर, पावर हाऊस, व्यंकटपुरा पेठ, धननीची बाग, करंडबीनाका, पोळ वस्ती, पावर हाऊस झोपडपट्टी, चिमणपुरा पेठ.
- बुधवार : मनामती चौक, गुजर आळी, चिमणपुरा, ढोणे कॉलनी.
- गुरुवार : भटजी महाराज मठ परिसर, रामाचा गोट, गवंडी आळी, मंगळवार तळे, कोल्हटकर आळी, नागाचा पार, पद्मावती मंदिर परिसर, होलार समाज मंदिर परिसर, मंगळवार पेठ, ठक्कर कॉलनी, बोगदा ते समर्थ मंदिर, धस कॉलनी, दस्तगीरनगर.
- शुक्रवार : संत कबीर सोसायटी व पोळ वस्ती, पापाभाई पत्रेवाला चाळ, चिमणपुरा पेठ, गारेचा गणपती, मनामती चौक, नागाचा पार.
- शनिवार : शुक्रवार पेठ, प्रतापगंज पेठ, बुधवार नाका, नामदेव वाडी.
- रविवार : आदालत वाडा परिसर, माची पेठ, बोगदा ते बालाजी अपार्टमेंट परिसर, कांबळे वस्ती, जांभळे वाडा परिसर, बोगदा परिसर, जंगी वाडा, गोल मारुती, गोल मारुती ते राजवाडा लाईन.