सातारा :  सैदापूर येथे मोबाईल शॉपी फोडली, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 11:47 IST2018-05-09T11:47:27+5:302018-05-09T11:47:27+5:30

सैदापूर येथील मोबाईल शॉपी मंगळवारी रात्री चोरट्यांंनी फोडून दोन मोबाईल व रोख रक्कम असा एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

Satara: A mobile shopper broke out at Saidapur | सातारा :  सैदापूर येथे मोबाईल शॉपी फोडली, गुन्हा दाखल

सातारा :  सैदापूर येथे मोबाईल शॉपी फोडली, गुन्हा दाखल

ठळक मुद्देसैदापूर येथे मोबाईल शॉपी फोडलीचोरट्यांनी शटर उचकटून आत केला प्रवेश

सातारा : सैदापूर येथील मोबाईल शॉपी मंगळवारी रात्री चोरट्यांंनी फोडून दोन मोबाईल व रोख रक्कम असा एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

याबाबत माहिती अशी की, तुलसीदास गणपत चव्हाण (वय ६१, रा. करंजे, ता. सातारा) यांची सैदापूर, ता. सातारा येथे मोबाईल शॉपी आहे. मंगळवारी रात्री चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला.

दुकानातील दोन मोबाईल व रोख असा एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.

 

Web Title: Satara: A mobile shopper broke out at Saidapur