सातारा : मटका किंग जब्बार पठाणकडून तडीपारीचे उल्लंघन, मेढा पोलिसांच्या अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 15:39 IST2018-04-18T15:39:23+5:302018-04-18T15:39:23+5:30
सातारा शहर व परिसरात मटक्याचे जाळे निर्माण करणारा मटका किंग जब्बार पठाण (वय ४९, मेढा, ता.जावळी) याला मेढा पोलिसांनी तडीपारीचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अटक केली. विशेष म्हणजे पठाणने आत्तापर्यंत दोनवेळा तडीपारीचा भंग केला आहे.

सातारा : मटका किंग जब्बार पठाणकडून तडीपारीचे उल्लंघन, मेढा पोलिसांच्या अटकेत
सातारा : शहर व परिसरात मटक्याचे जाळे निर्माण करणारा मटका किंग जब्बार पठाण (वय ४९, मेढा, ता.जावळी) याला मेढा पोलिसांनी तडीपारीचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अटक केली. विशेष म्हणजे पठाणने आत्तापर्यंत दोनवेळा तडीपारीचा भंग केला आहे.
जब्बार पठाण हा गेल्या अनेक वर्षांपासून मटका व्यवसायामध्ये कार्यरत आहे. पोलिसांनी अनेकवेळा विविध ठिकाणी सुरू असलेल्या त्याच्या अड्ड्यावर छापा टाकून त्याच्या साथीदारांना अटक केली होती. मात्र, जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा तो साथीदारांच्या मदतीने मटका घेता होता.
त्याला अनेकदा सुधारण्याची पोलिसांनी संधी दिली होती. परंतु त्याच्यामध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जब्बार पठाणला चार तालुक्यातून तडीपार केले होते.
मात्र, तरीसुद्धा तो आदेशाचा भंग करत मेढा परिसरात आला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. दुसऱ्यांना त्याने तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.