शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

साताऱ्यात एकाचा तलवार, कोयत्याने वार करून निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 17:41 IST

Satara area, Crime News, Police, Murder घरासमोर चिकनचे खरकटे टाकण्याच्या कारणावरून दोन वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा राग मनात धरून एकाची तलवार आणि कोयत्याने निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील बोगदा परिसरात मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडली. या खून प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात एकाचा तलवार, कोयत्याने वार करून निर्घृण खून पूर्व वैमनस्यातून कृत्य; चौघांना अटक

सातारा: घरासमोर चिकनचे खरकटे टाकण्याच्या कारणावरून दोन वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा राग मनात धरून एकाची तलवार आणि कोयत्याने निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील बोगदा परिसरात मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडली. या खून प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे.बजरंग लक्ष्मण गावडे (वय ४०, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकाश नितीन बल्लाळ (वय २०), अमन इस्माईल सय्यद (वय २०), तुषार प्रल्हाद धोत्रे (वय २४), आकाश उदयसिंह शिंदे (वय २४, सर्व रा. समर्थ मंदिर, बोगदा परिसर सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एक वर्षांपूर्वी आकाश बल्लाळ याच्या घरासमोर चिकनचे खरकटे टाकण्यात आले होते. यावरून बजरंग गावडे आणि आकाश बल्लाळ यांच्यात मारामारी झाली होती. यावेळी गावडे याच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता.

या भांडणामुळे आकाश बल्लाळला तो राहत असलेले भाड्याचे घर सोडून दुसरीकडे राहायला जावे लागले होते, असा समज झाल्याने आकाश बल्लाळ गावडेवर चिडून होता. दरम्यान, मंगळवार दि. १५ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास बजरंग गावडे हा बोगद्या परिसरातील रस्त्याने घराकडे निघाला होता.

यावेळी आकाश बल्लाळ, अमन सय्यद, तुषार धोत्रे, आकाश शिंदे यांनी बजरंग गावडे याच्यावर कोयता आणि तलवारीने जोरदार हल्ला चढवला. बजरंग गावडे यांच्या चेहर्‍यावर मानेवर खोलवर घाव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बजरंग गावडे यांचा संपूर्ण चेहरा छिन्नविछीन्न झाला. या प्रकारानंतर संशयित हल्लेखोर तेथून पसार झाले. रात्री बोगदा परिसरात खून झाल्याची माहिती नागरिकांना समजल्यानंतर एकच खळबळ उडाली.सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरणच्या टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून हल्लेखोरांची माहिती या पथकाने घेतली. हल्लेखोर अज्ञात असल्याने तपासाचे आव्हान पोलिसांसमोर होते.

गावडे यांच्या घरातल्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आमचा कोणासोबतही वाद नव्हता अशी त्यांनी माहिती पोलिसांना दिली. मात्र गुन्हे प्रकटीकरण शाखेने कौशल्यपूर्ण तपास करत चौघाही हल्लेखोरांना काही तासातच अटक केली.पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार प्रशांत शेवाळे, अविनाश चव्हाण, गणेश घाडगे, अभय साबळे, विशाल धुमाळ, शिवाजी भिसे, गणेश भोंग यांनी या खुनाचा काही तासातच छडा लावला.

टॅग्स :MurderखूनSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस