शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: जयंत पाटील यांनी घेतली मदन भोसले यांची भेट, दोन्ही नेत्यात दीड तास चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 16:37 IST

Satara: आगामी विधानसभेच्या निवडणुकीने पार्श्वभूमीवर मदन भोसले यांच्यावर कार्यकर्त्यांकडून वेगळी भूमिका घेण्याचा दबाव येत असताना या भेटीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून मदन भोसले हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

- दीपक देशमुखसातारा - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी सकाळी भाजपचे नेते माजी आमदार मदन भोसले यांची सातारा निवासस्थानी भेट घेतली. आगामी विधानसभेच्या निवडणुकीने पार्श्वभूमीवर मदन भोसले यांच्यावर कार्यकर्त्यांकडून वेगळी भूमिका घेण्याचा दबाव येत असताना या भेटीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून मदन भोसले हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

कार्यकर्त्यांकडूनही मदन भोसले यांना वेगळी भूमिका घेण्याबाबत सातत्याने आग्रह होत आहे. यामुळे मदन भोसले यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी वाई महाबळेश्वर आणि खंडाळा तालुक्याच्या दौरा सुरू केला आहे. दरम्यान रविवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी मदन भोसले यांची सातारा निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दीड तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली. याबाबत मदन भोसले यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी जयंत पाटील यांच्यासमवेत मित्रत्वाचे संबंध आहेत. फक्त सदिच्छा भेट असून ते विचारपूस करण्यास आले असल्याचे सांगितले. मात्र, दोन राजकीय नेते सुमारे दीड तास चर्चा करतात, त्यावेळी राजकारणाविषयी कोणती चर्चा तर झाली याबाबत अधिक भाष्य करण्याचे मदन भोसले यांनी टाळले.

वाई मतदार संघातील कार्यकर्त्यांकडून आगामी विधानसभेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारीची मागणी होणार असल्याने आणि विद्यमान आमदार त्यांचा असल्याने माझ्या कार्यकर्त्यांकडून वेगळी भूमिका घेण्याबाबत सातत्याने आग्रह होत असल्याचे भोसले यांनी सांगितले. तथापि, आपण या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याशी संपर्क साधला नसून राष्ट्रवादी पक्षांकडूनही कोणी संपर्क साधला नसल्याचे त्यांनी सांगितले. जगातील तीनही तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन निर्णय घेऊन पुढील निर्णय घेणार आहे, असे भोसले यांनी सांगितले.

 यशवंतरावांचे मानसपुत्र काय भूमिका घेणार? यशवंतराव चव्हाण यांचे खंदे सहकारी म्हणून दिवंगत प्रतापराव भोसले यांचे नाव घेतले जाते तर शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र. मदन भोसले यांच्याबाबत मानसपुत्र कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता आहे. 

 वाईत राजकीय समीकरण बदलांचे संकेतआमदार मकरंद पाटील अजितदादा गटामध्ये गेल्यामुळे वाई मतदासंघात शरद पवार गटामध्ये राजकीय पोकळी निर्माण झालीय. मदन भोसले यांना सोबत घेऊन पोकळी भरून निघू शकते, याची चर्चा मतदासंघांत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Jayant Patilजयंत पाटीलwai-acवाई