सातारा : बुधावलेवाडीत गोळीबार, तरुण जखमी : जुन्या भांडणाचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:37 IST2018-12-18T16:34:01+5:302018-12-18T16:37:29+5:30

जुन्या भांडणाच्या कारणावरून बुधावलेवाडी, ता. खटाव येथे सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर बंदुकीतून गोळीबार केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ​

Satara: Guddhalwadi firing, young injured: reason for old quarrel | सातारा : बुधावलेवाडीत गोळीबार, तरुण जखमी : जुन्या भांडणाचे कारण

सातारा : बुधावलेवाडीत गोळीबार, तरुण जखमी : जुन्या भांडणाचे कारण

ठळक मुद्देबुधावलेवाडीत गोळीबार, तरुण जखमी जुन्या भांडणाचे कारण

सातारा : जुन्या भांडणाच्या कारणावरून बुधावलेवाडी, ता. खटाव येथे सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर बंदुकीतून गोळीबार केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत माहिती अशी की, बुधावलेवाडीत सुरेश नारायण बुधावले व सुजित सदाशिव बुधावले या दोन कुटुंबांत गेल्या वर्षापासून भांडणे आहेत. त्याचा राग मनात धरून सोमवारी सुरेश बुधावले याने शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी सुजित बुधावले हा सुरेश याच्या घरी गेला. त्यावरून सुरेशने बंदुकीने गोळीबार केला.

यात सुजितला गोळी लागल्याने तो जखमी झाला. त्याला तातडीने पुसेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Satara: Guddhalwadi firing, young injured: reason for old quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.