सातारा : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तरुणीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 17:19 IST2019-01-01T17:18:20+5:302019-01-01T17:19:24+5:30
शाहूपुरी रस्त्यावर एका तरुणीला दुचाकी आडवी मारून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत तिच्या अंगाशी झोंबाझोंबी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज नईम शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

सातारा : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तरुणीचा विनयभंग
सातारा : शाहूपुरी रस्त्यावर एका तरुणीला दुचाकी आडवी मारून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत तिच्या अंगाशी झोंबाझोंबी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज नईम शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २३ वर्षीय पिडीत तरुणीशी अरबाज नईम शेख (रा. गुरुवार पेठ) याने दोन वषापूर्वी फेसबुकद्वारे तिच्याशी मैत्री केली. तेव्हापासून तो तिचा दुचाकीवर वारंवार पाठलाग करून लग्न करण्याची जबरदस्ती करत होता.
सोमवारी सायंकाळी तरुणी सातारा शहरात येत असताना पाठीमागून येऊन गाडी आडवी मारली. तिच्या गाडीची चावी हिसकावून घेत रिव्हॉल्व्हर व चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच तिच्या अंगाशी लगट केली. याप्रकरणी तरुणीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बी. पी. किर्दत करीत आहेत.