सातारा : चचेगावात बिबट्याकडून चार शेळ्या अन् एक बोकड ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 12:36 IST2018-03-06T12:36:10+5:302018-03-06T12:36:10+5:30

चचेगाव, ता. कऱ्हाड येथे बिबट्याकडून पाच शेळ्या ठार केल्याची घटना मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये चार शेळ्या अन् एक बोकडाचा समावेश आहे. चचेगाव येथील जुने गावठाण परिसरात संभाजी गणपती पवार यांच्या गोठ्यात ही घटना घडली असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.

Satara: Four goats and a buck killed by leopard in Chachega | सातारा : चचेगावात बिबट्याकडून चार शेळ्या अन् एक बोकड ठार

सातारा : चचेगावात बिबट्याकडून चार शेळ्या अन् एक बोकड ठार

ठळक मुद्देचचेगावात बिबट्याकडून चार शेळ्या अन् एक बोकड ठारग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण बिबट्याच्या प्रकारामुळे खळबळ

मलकापूर : चचेगाव, ता. कऱ्हाड येथे बिबट्याकडून पाच शेळ्या ठार केल्याची घटना मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये चार शेळ्या अन् एक बोकडाचा समावेश आहे. चचेगाव येथील जुने गावठाण परिसरात संभाजी गणपती पवार यांच्या गोठ्यात ही घटना घडली असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, चचेगाव येथील जुने गावठाण परिसरात संभाजी गणपती पवार यांचा गोठा आहे. यामध्ये त्यांनी चार शेळ्या व एक बोकड बांधले होते.

नेहमीप्रमाणे पवार आपल्या गोठ्यात सहाळी सहा वाजता गेले असता त्यांना चार शेळ्या व एक बोकड मृतावस्थेत आढळून आले.

त्यांनी याबाबतची माहिती वनाधिकाऱ्यांना दिली. दरम्यान, एकाचवेळी पाच पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केल्यामुळे चचेगाव विभागात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Satara: Four goats and a buck killed by leopard in Chachega