सातारा : पुसेगाव पोलिसांकडून चार डीजे सील, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 14:39 IST2018-09-20T14:36:42+5:302018-09-20T14:39:12+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत पुसेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने खटाव, खातगुण, काटकरवाडी व पुसेगाव येथे चार डीजे व इतर साहित्य सील करण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईने डीजे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

सातारा : पुसेगाव पोलिसांकडून चार डीजे सील, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाई
खटाव (सातारा) : उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत पुसेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने खटाव, खातगुण, काटकरवाडी व पुसेगाव येथे चार डीजे व इतर साहित्य सील करण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईने डीजे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण होणार नाही याची दक्षता जिल्ह्यातील संबंधीत पोलीस ठाण्याच्या वतीने घ्यावी. तसेच डीजे आढळल्यास तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिले आहेत.
त्यानुसार पुसेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या खटाव, खातगुण, काटकरवाडी तसेच पुसेगाव येथील चार डीजेवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
न्यायालयाच्या आदेशाची पूर्व कल्पना तसेच माहिती याआधीच सर्व डीजे चालक व मालक यांना देण्यात आली आहे. पुसेगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावात ही कारवाई यापुढेही करण्यात येणार असल्याचे पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी सांगितले.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रकाश इंगळे, पोलीस हवलदार सचीन जगताप, इमतियाज मुल्ला, गणेश मुंडे आदी सहभागी झाले होते.