सातारा : खटावमध्ये लॉन्ड्री व स्टेशनरी दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 14:46 IST2018-04-19T14:46:28+5:302018-04-19T14:46:28+5:30
खटावमधील भैरवनाथ मंदिरासमोर असलेल्या लॉन्ड्री व स्टेशनरीच्या दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या भीषण आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.

सातारा : खटावमध्ये लॉन्ड्री व स्टेशनरी दुकानाला आग
खटाव : खटावमधील भैरवनाथ मंदिरासमोर असलेल्या लॉन्ड्री व स्टेशनरीच्या दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या भीषण आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
याबाबत माहिती अशी, खटावमध्ये गुरुवारी पहाटे अशोक मधुकर शेडगे यांच्या लॉन्ड्री, स्टेशनरी व झेरॉक्स सेंटर या दुकानामध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे दुकानात आग लागली.
दुकानात असलेले लॉन्ड्रीचे कपड्यांनी आगीमुळे रौद्ररूप धारण केले. धुराचे लोट पसरल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी पोहोचून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
तब्बल एक तासानंतर आग आटोक्यात आली. यात दुकानातील कपडे, स्टेशनरी साहित्य, फ्रिज, झेरॉक्स मशीन, सिलिंग फॅनसह लाकडी फर्निचर जळून खाक झाले. या आगीत अंदाजे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.