शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
4
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
5
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
7
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
8
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
9
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
10
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
11
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
12
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
13
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
14
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
15
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
16
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
17
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
18
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
19
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
20
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर

साताऱ्यात आगीत रेशनदुकानासह साहित्य जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:36 AM

सातारा येथील शेटे चौकातील श्रीकांत शेटे यांच्या रेशनदुकानाला रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत धान्य साठ्यांसह विविध प्रकार माल जळून खाक झाला. यामध्ये सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात आगीत रेशनदुकानासह साहित्य जळून खाकसुमारे चार लाखांचे नुकसान ; शेटे चौकातील घटना

सातारा : येथील शेटे चौकातील श्रीकांत शेटे यांच्या रेशनदुकानाला रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत धान्य साठ्यांसह विविध प्रकार माल जळून खाक झाला. यामध्ये सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी, श्रीकांत शेटे हे राहत असलेल्या पार्किंगमध्येच त्यांचे आॅफिस आहे. त्यांच्याकडे विविध कंपनीच्या एजन्सी आणि रेशनिंग दुकानही आहे. पार्किंगमध्येच हा सर्व माल आणि धान्याची पोती ते ठेवत होते.

दरम्यान, रविवारी पहाटे सर्वजण गाढ झोपेत असतानाच अचानक शॉर्ट सर्किटमुळे पार्किंगमध्ये आग लागली. सर्वत्र धूर पसरल्याने शेटे यांच्या कुटुंबातील काहींना जाग आली. त्यानंतर त्यांनी पेठेतील इतर लोकांना याची माहिती दिली. पेठेतील अनेकांनी तत्काळ शेटे यांच्या घराकडे धाव घेतली.

काहींनी अग्निशामक आणि पोलिसांनाही याची माहिती दिली. केवळ पंधरा मिनिटांत अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचे फवारे मारून सुमारे अर्ध्या तासांनंतर आग आटोक्यात आणली. तोपर्यंत आगीत विविध कंपनीची बिस्कीटे, अटा पोती, ३० किलो ढाळ, शंभर कट्टे पोती, पाच मीटर, विद्यूत मोटारी, सीसीटीव्ही आदी साहित्य जळून खाक झाले तर पाण्याच्या फवाऱ्यामुळे तांदूळ आणि गहू भिजून खराब झाला.

केवळ १६ कट्टे सुरक्षित राहिले. या आगीची माहिती मिळाल्यानंतर तहसील कार्यालयातून अधिकारी तेथे आले. त्यांनी पंचनामा केला. या आगीत शेटे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यांना तत्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी पेठेतील नागरिकांनी केली आहे. शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.घरातील लोकांना टेरेसवर पाठवले..रविवारी पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत असताना पार्किंगमध्ये आग लागली. घरात धूर आल्यानंतर महिला व लहान मुलांना खबरदारी म्हणून टेरेसवर पाठविण्यात आले. यावेळी अनेकांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. मात्र, तत्पूर्वीच ही आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :fireआगSatara areaसातारा परिसर