सातारा : वाईत इलेक्ट्रिक दुकान जळून इलेक्ट्रिक वस्तूंसह लाखो साहित्य रुपयांचे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 14:54 IST2018-04-11T14:54:26+5:302018-04-11T14:54:26+5:30

सराफ बाजारपेठेतील एका इलेक्ट्रिक दुकानाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत इलेक्ट्रिक वस्तूंसह लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.

Satara: Electricity burns electric stores and millions of materials including electric items | सातारा : वाईत इलेक्ट्रिक दुकान जळून इलेक्ट्रिक वस्तूंसह लाखो साहित्य रुपयांचे खाक

सातारा : वाईत इलेक्ट्रिक दुकान जळून इलेक्ट्रिक वस्तूंसह लाखो साहित्य रुपयांचे खाक

ठळक मुद्देवाईत इलेक्ट्रिक दुकान जळून लाखो साहित्य रुपयांचे खाकजीवितहानी नाही. वाई पोलीस ठाण्यात तक्रार

वाई : सराफ बाजारपेठेतील एका इलेक्ट्रिक दुकानाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत इलेक्ट्रिक वस्तूंसह लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.

याबाबत माहिती अशी की, वाई शहरातील सराफ पेठेतील महावीर चौकात असलेल्या हिरवे इलेक्ट्रिक दुकानाला मध्यरात्री आग लागली. दुकानातील इलेक्ट्रिक साहित्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच वाई नगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले.

एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात राजेंद्र हिरवे यांनी तक्रार दिली आहे.

Web Title: Satara: Electricity burns electric stores and millions of materials including electric items