सातारा : पुसेगावातील दीपक मसुगडे अन् त्याच्या टोळीवर मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 15:12 IST2018-06-06T15:12:27+5:302018-06-06T15:12:27+5:30

पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत मारहाण करून जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार दीपक नामदेव मसुगडे व टोळीतील तीन सदस्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली.

Satara: Deepak Mansuga in Pusgaon and Mokka on his gang | सातारा : पुसेगावातील दीपक मसुगडे अन् त्याच्या टोळीवर मोक्का

सातारा : पुसेगावातील दीपक मसुगडे अन् त्याच्या टोळीवर मोक्का

ठळक मुद्देपुसेगावातील दीपक मसुगडे अन् त्याच्या टोळीवर मोक्का विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

सातारा : पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत मारहाण करून जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार दीपक नामदेव मसुगडे व टोळीतील तीन सदस्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली.

याबाबत मोहती अशी की, रणशिंगवाडी, ता. खटाव येथे सायकलवर जाणाऱ्या एकास अडवून हवा मारण्याचा पंप डोक्यात घालून दुखापत केली व त्याच्या साथीदारांनी जबरदस्ती खिशातले दहा हजार काढून घेतल्याचा गुन्हा पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याच्या तपासामधून ही टोळी चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, गर्दीत मारामारी व खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे करीत होती. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे मोक्काचा प्रस्ताव पाठविला होता. तो त्यांनी मंजूर केला.

Web Title: Satara: Deepak Mansuga in Pusgaon and Mokka on his gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.