सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:51 IST2018-12-20T12:50:00+5:302018-12-20T12:51:12+5:30

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाट्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील अमोल मोहन पाटील (वय ३४, रा. जुनी ...

Satara: The death of youth in an unknown vehicle | सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

ठळक मुद्देअज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यूअपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाट्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील अमोल मोहन पाटील (वय ३४, रा. जुनी म्हाडा कॉलनी, कोयना सोसायटी, सदर बझार सातारा) हा युवक ठार झाला. हा अपघात बुधवारी रात्री नऊच्या सुमारास झाला.

अमोल पाटील हा बुधवारी रात्री दुचाकीवरून बॉम्बे रेस्टॉरंट बाजूकडून वाढे फाट्याकडे येत होता. यावेळी समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अमोल हा काही अंतर फरफटत पुढे गेला.

त्यामुळे त्याच्या डोक्याला आणि हाता पायाला गंभीर जखम झाली. या अपघातानंतर काही नागरिकांनी त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

Web Title: Satara: The death of youth in an unknown vehicle