सातारा : सांगवी येथे सर्पदंशाने वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 15:19 IST2018-12-28T15:18:32+5:302018-12-28T15:19:15+5:30
फलटण तालुक्यातील सांगवी येथील दादा रकमाजी सोनटक्के (वय ८५) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

सातारा : सांगवी येथे सर्पदंशाने वृद्धाचा मृत्यू
ठळक मुद्देसांगवी येथे सर्पदंशाने वृद्धाचा मृत्यूशासकीय रुग्णालयात दाखल
सातारा : फलटण तालुक्यातील सांगवी येथील दादा रकमाजी सोनटक्के (वय ८५) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
दादा सोनटक्के यांना चालता येत नाही. जमिनीवर बसूनच ते पुढे फरकटत जात होते. यावेळी अचानक हाताला सर्पदंश झाला.
शेतातील घरासमोर तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली. त्यानंतर त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला