सातारा : काविळीच्या साथीने पोलिसाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 12:58 IST2018-07-11T12:56:16+5:302018-07-11T12:58:43+5:30

सातारा पोलीस दलातील कॉन्स्टेबल स्वप्नील किशोर जाधव (वय ३२, रा. निरंजन अपार्टमेंट, चिमणपुरा पेठ, सातारा) यांचा कावीळ आजारामुळे मंगळवारी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Satara: The death of policemen along with blacksmith | सातारा : काविळीच्या साथीने पोलिसाचा मृत्यू

सातारा : काविळीच्या साथीने पोलिसाचा मृत्यू

ठळक मुद्दे काविळीच्या साथीने पोलिसाचा मृत्यूखासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

सातारा : सातारा पोलीस दलातील कॉन्स्टेबल स्वप्नील किशोर जाधव (वय ३२, रा. निरंजन अपार्टमेंट, चिमणपुरा पेठ, सातारा) यांचा कावीळ आजारामुळे मंगळवारी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत माहिती अशी की, स्वप्नील जाधव हे पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना कावीळ आजाराची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, त्यांच्या लिव्हरची सूज कमी न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Satara: The death of policemen along with blacksmith