सातारा :गमेवाडीत आढळला मृत बिबट्या, मृत्यू नैसर्गिक असल्याचा वनविभागाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:18 IST2018-01-08T12:45:52+5:302018-01-08T13:18:37+5:30

कऱ्हाड (सातारा) तालुक्यातील गमेवाडी गावच्या हद्दीत खाणसाळ नावाच्या शिवारात सोमवारी सकाळी मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. संबंधित बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Satara: Dead leopards found in Gamewadi, deaths are natural | सातारा :गमेवाडीत आढळला मृत बिबट्या, मृत्यू नैसर्गिक असल्याचा वनविभागाचा अंदाज

सातारा :गमेवाडीत आढळला मृत बिबट्या, मृत्यू नैसर्गिक असल्याचा वनविभागाचा अंदाज

ठळक मुद्देवनविभागाचे कर्मचारीही घटनास्थळी बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा अंदाज

कऱ्हाड (सातारा) : तालुक्यातील गमेवाडी गावच्या हद्दीत खाणसाळ नावाच्या शिवारात सोमवारी सकाळी मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. संबंधित बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

गमेवाडीत खाणसाळ नावाचे शिवार आहे. या शिवारात दीपक रघुनाथ जाधव यांची शेतजमीन आहे. शेतात ऊस असून, सोमवारी सकाळी दीपक जाधव हे वैरणीसाठी फडात गेले होते.

त्यावेळी शेतातच बिबट्या मरून पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही बाब कऱ्हाड तालुका पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक भापकर यांच्यासह कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले.

त्यानंतर काही वेळातच वनविभागाचे कर्मचारीही घटनास्थळी आले. मृतावस्थेत आढळलेला बिबट्या मादी जातीचा असून त्याचा मृत्यू आजारपणामुळे झाला असावा, असा अधिकाऱ्यांचा कयास आहे.

Web Title: Satara: Dead leopards found in Gamewadi, deaths are natural