सातारा : बेपत्ता मुलीचा मृतदेह नदीपात्रात, घरात चिठ्ठी सापडलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 13:36 IST2018-07-09T13:34:18+5:302018-07-09T13:36:03+5:30

जावळी तालुक्यातील कुडाळ येथील ज्योती नंदकुमार पवार या बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी कुडाळच्या नदीपात्रात सापडला. दहावीत कमी गुण मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचे तिने चिठ्ठीत लिहिले होते.

Satara: The dead body of the missing daughter found in the river bank, in the house | सातारा : बेपत्ता मुलीचा मृतदेह नदीपात्रात, घरात चिठ्ठी सापडलेली

सातारा : बेपत्ता मुलीचा मृतदेह नदीपात्रात, घरात चिठ्ठी सापडलेली

ठळक मुद्देबेपत्ता मुलीचा मृतदेह नदीपात्रात, घरात चिठ्ठी सापडलेली कुडाळच्या नदीपात्रात आत्महत्या केल्याचे स्पष्ट

मेढा : जावळी तालुक्यातील कुडाळ येथील ज्योती नंदकुमार पवार या बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी कुडाळच्या नदीपात्रात सापडला. दहावीत कमी गुण मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचे तिने चिठ्ठीत लिहिले होते.

याबाबत माहिती अशी की, ज्योतीला दहावीच्या परीक्षेत ७७ टक्के गुण मिळाले होते. निकाल लागल्यानंतर कमी गुण मिळाल्याने ती शांतच होती. अशातच रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ती झोपेतून उठली. आजीला अंघोळीला पाणी दिल्यानंतर नळाचे पाणी भरते, असे सांगून ती घराबाहेर पडली. परंतु ती बराच वेळ परत न आल्याने कुटुंबीयांच्या लक्षात आले.

ज्योतीचा शोध घेण्यास सुरुवात झाल्यानंतर कुटुंबीयांना घरामध्ये ज्योतीने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी वाचल्यानंतर पवार कुटुंबीय हादरून गेले. दहावीमध्ये मला कमी मार्कस मिळाले आहेत. त्यामुळे नैराश्यातून मी माझा जीव देत आहे. याला कोणालाही जबाबदार धरू नये, असे चिठ्ठीमध्ये तिने लिहिले होते.

ही चिठ्ठी ज्योतीच्या वडिलांनी पोलिसांकडे दिली. त्यानंतर पोलिसांनीही ज्योतीच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. ज्योतीचा शोध सुरू असतानाच सोमवारी सकाळच्या सुमारास तिचा मृतदेह कुडाळच्या नदीपात्रात सापडला. या आत्महत्येची नोंद कुडाळ पोलिसांत झाली आहे.
 

Web Title: Satara: The dead body of the missing daughter found in the river bank, in the house