सातारा : युवकासोबत बोलल्याचा गुन्हा युवतीला पट्ट्याने बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 15:38 IST2018-12-21T15:36:10+5:302018-12-21T15:38:28+5:30
तू यवतेश्वरला कोणाबरोबर फिरायला गेली होतीस तसेच युवकासोबत का बोललीस? अशी विचारणा करून अठरा वर्षीय युवतीला लाकडी दांडके आणि चमड्याच्या पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : युवकासोबत बोलल्याचा गुन्हा युवतीला पट्ट्याने बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा
सातारा : तू यवतेश्वरला कोणाबरोबर फिरायला गेली होतीस तसेच युवकासोबत का बोललीस? अशी विचारणा करून अठरा वर्षीय युवतीला लाकडी दांडके आणि चमड्याच्या पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
फिरोज काशीम हेलवाककर (वय ३०), आरबाज राजू शेख (वय २०), शाहरुख राजू शेख (वय २४), अमीर हेलवाककर (रा. भीमाबाई आंबेडकर, सदर बझार सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवतीला विचारणा केल्यानंतर संबंधितांनी बेदम मारहाण केली.
यामध्ये संबंधित युवती जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संशयितांनी ह्यतुला जिवंत सोडणार नाही,ह्ण अशी धमकी दिली असल्याचे युवतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास हवालदार एम. के. जाधव हे करत आहेत.