शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंना दिलासा, सातारा न्यायालयाकडून जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 15:57 IST

सदावर्तेंना न्यायालयाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

सातारा : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रलंबित जामीन अर्जावरील निर्णय आज, बुधवारी जिल्हा न्यायालयाने दिला असून, सदावर्तेंना न्यायालयाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. सदावर्ते हे सध्या अर्थररोड कारागृहात आहेत.खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यामुळे सातारा पोलिसांनी त्यांची अर्थररोड कारागृहात रवानगी केली.परंतु त्यांच्या जामीन अर्जावरील निर्णय प्रलंबित होता. त्यावर बुधवारी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने सदावर्ते यांचा जामीन मंजूर केला.कोल्हापूर पोलिसांकडूनही ताबा घेण्याच्या हालचालीॲड. सदावर्ते याच्या अटकेसाठी कोल्हापुरातील शाहुपुरी पोलिसांचे विशेष पथक काल, मंगळवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. सकल मराठा क्रांती मोर्चाचे कोल्हापुरातील समन्वयक दिलीप पाटील यांनी ॲड. सदावर्ते याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ॲड. सदावर्ते यांनी विविध मार्गांनी पैसे जमवून ते मराठा आरक्षणविरोधी न्यायालयीन प्रक्रियेसाठी खर्च केले, पण त्याचा हिशेब दिला नसल्याचा पाटील यांनी आरोप करून त्यांच्या सर्व कारभाराच्या चौकशीची मागणी केली आहे.कोल्हापुरातील सुनावणी लांबणीवरसरकारी पक्षाला कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी लांबणीवर पडली. त्यामुळे ॲड. सदावर्ते यांच्या यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता आहे. प्रथमवर्ग जिल्हा व सत्र न्यायाधिश महेश जाधव यांच्या समोर सुनावणी सुरु आहे. अटकपुर्व जामीन अर्जावर गुरुवारी (दि 21) ला पुढील सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCourtन्यायालय