Satara: सामान्य माणूस शरद पवारांबरोबरच! रोहित पाटील यांचा विश्वास

By प्रमोद सुकरे | Updated: July 3, 2023 10:36 IST2023-07-03T10:36:17+5:302023-07-03T10:36:47+5:30

Rohit Patil: सर्वसामान्य माणूस हा शरद पवारांच्या बरोबरच राहणार असून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यात सर्वात मोठा पक्ष बनेल असा विश्वास माजी मंत्री आर आर पाटील यांची सुपुत्र  रोहित पाटील यांनी व्यक्त केला.

Satara: common man with Sharad Pawar! Faith of Rohit Patil | Satara: सामान्य माणूस शरद पवारांबरोबरच! रोहित पाटील यांचा विश्वास

Satara: सामान्य माणूस शरद पवारांबरोबरच! रोहित पाटील यांचा विश्वास

- प्रमोद सुकरे 

कराड - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सामान्य माणसाला सत्तेच्या प्रवाहात आणण्याचे मोठं काम केलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा शरद पवारांच्या बरोबरच राहणार असून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यात सर्वात मोठा पक्ष बनेल असा विश्वास माजी मंत्री आर आर पाटील यांची सुपुत्र  रोहित पाटील यांनी व्यक्त केला.

कराड येथे सोमवारी सकाळी यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळावर  येणाऱ्या शरद पवारांना पाठिंबा दर्शवण्यासाठी रोहित पवार व त्यांची समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. त्यावेळी ते माध्यमांची बोलत होते.  रोहित पाटील म्हणाले ,राष्ट्रवादी हा वेगळा विचार घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे. आज अनेक जण या पक्षाला सोडून गेले असले तरी सामान्य माणूस मात्र नेहमीच शरद पवारांच्या विचारावर प्रेम करणाऱा आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये शरद पवारांची ताकद पुन्हा एकदा स्पष्ट होईल असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Satara: common man with Sharad Pawar! Faith of Rohit Patil