सातारा : लाच घेतल्याप्रकरणी एमआयडीसीतील अजून एक लिपिक जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 14:51 IST2017-12-20T14:48:55+5:302017-12-20T14:51:42+5:30
सातारा येथील एमआयडीसी कार्यालयाच्या लिपिकाला लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभगाकडून अटक करण्यात आली. महादेव गोविंद पाटील (वय ४२, सध्या रा. एमआयडीसी सातारा, मूळ रा. अमरापूर, ता. कडेगाव जि. सांगली) असे त्याचे नाव आहे.

सातारा : लाच घेतल्याप्रकरणी एमआयडीसीतील अजून एक लिपिक जाळ्यात
सातारा : येथील एमआयडीसी कार्यालयाच्या लिपिकाला लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली. महादेव गोविंद पाटील (वय ४२, सध्या रा. एमआयडीसी सातारा, मूळ रा. अमरापूर, ता. कडेगाव जि. सांगली) असे त्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महादेव पाटील या लिपिकाने एमआयडीसीमधील प्लॉटवर सर्व्हिस चार्जची थकबाकी कमी केल्याच्या मोबदल्यात व त्या प्लॉटवरील नो ड्यूजचे प्रमाणपत्र देण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच मागितली होती.
याप्रकरणी सातारा एमआयडीसी कार्यालयाचा लिपिक याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. दरम्यान, एमआयडीसीमधील गेल्या १५ दिवसांतील ही दुसरी कारवाई असून, दोन्ही प्रकरणातील तक्रारदार एकच आहे.