शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

सातारा : एमआयडीसीतील चोरीप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:02 AM

सातारा एमआयडीसीतील एका गोदामातून सात लाखांच्या चहा पावडरची चोरी करणाऱ्या दोघांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चहा पावडरसह टेम्पो असा एकूण साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देएमआयडीसीतील चोरीप्रकरणी दोघांना अटकसाडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सातारा : सातारा एमआयडीसीतील एका गोदामातून सात लाखांच्या चहा पावडरची चोरी करणाऱ्या दोघांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चहा पावडरसह टेम्पो असा एकूण साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, सातारा एमआयडीसीतील श्री जी कंपनीच्या गोदामातून कामगार दशरथ उत्तम फडतरे (वय ३२, रा. शनिवार पेठ, सातारा) व विलास हरी गायकवाड (६१, रा. केसरकर पेठ, सातारा) या दोघांनी संगनमत करून शटरचे कुलूप उघडून गोदामातून चहा पावडरचे १६७ बॉक्स चोरले. याची किंमत ६ लाख ९७ हजार ९१५ रुपये होती. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक बी. जे. ढेकळे यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करून चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला. त्याचबरोबर चोरीसाठी वापरलेला टेम्पो ताब्यात घेण्यात आला.या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक ढेकळे, हवालदार सुनील भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, धीरज कुंभार, ओमकार डुबल, शिवाजी भिसे, नीलेश गायकवाड, अमोल साळुंखे यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर