शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

झाडे तोडू नका म्हटल्याने सरपंचांना बेदम मारहाण; साताऱ्यात दहा जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 14:24 IST

सातारा : रस्त्यालगत असलेली झाडे तोडू नका, असे म्हटल्याच्या कारणावरून सरपंच अजित निवृत्ती मर्ढेकर (वय ४८, रा. ओझरे, ता. ...

सातारा : रस्त्यालगत असलेली झाडे तोडू नका, असे म्हटल्याच्या कारणावरून सरपंच अजित निवृत्ती मर्ढेकर (वय ४८, रा. ओझरे, ता. जावळी) यांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २३ रोजी सकाळी दहा वाजता घडली.तुकाराम लकडे, वैभव लकडे, शिवाजी लकडे, स्वप्नील लकडे, सुरेश लकडे, गणेश, ओंकार लकडे (सर्व रा. ओझरे, ता. जावळी) यांच्यासह दहा जणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. सरपंच अजित मर्ढेकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ओझरे गावच्या हद्दीतील रस्त्याच्याकडेला असलेली झाडे काहीजण तोडत आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानंतर मी गावातील काही लोकांना सोबत घेऊन तेथे गेलो.या जागेमध्ये असलेल्या रस्त्याची केस कोर्टात चालू आहे. तुम्ही रस्त्यालगतची झाडे तोडू नका, असे म्हणालो. या कारणावरून संशयितांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर काहींनी डोक्यात दगड, काठी मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ, दमदाटीही केली. सोबत असलेल्या लोकांनाही हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Sarpanch Beaten for Stopping Tree Cutting; Ten Booked

Web Summary : Sarpanch Ajit Mardhekar was brutally assaulted in Satara for objecting to illegal tree cutting. Ten individuals have been booked by Medha police following the incident where Mardhekar and others were attacked with stones and sticks after he told them the road case was in court.