शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

माजी विद्यार्थिनीच्या मदतीसाठी सरसावली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:41 IST

‘स्त्री शिक्षणाकडून स्त्री शक्ती संवर्धनाकडे’ हा वसा जोपासत संस्कारक्षम शिक्षणातून विद्यार्थिनींच्या जडणघडणीसाठी कऱ्हाडमधील शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला ...

‘स्त्री शिक्षणाकडून स्त्री शक्ती संवर्धनाकडे’ हा वसा जोपासत संस्कारक्षम शिक्षणातून विद्यार्थिनींच्या जडणघडणीसाठी कऱ्हाडमधील शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला कार्यरत आहे. केवळ ज्ञानदानच नव्हे, तर भावी आयुष्यात येणाऱ्या अडचणींमध्येही प्रशाला विद्यार्थिनींना मदत करत आली आहे. २००८-०९ या शैक्षणिक वर्षामध्ये आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी पुणे गाठलेली, त्याचबरोबर महिला आणि मुलींच्या हक्क व कर्तव्यासाठी जागरूक असणारी प्रशालेची माजी विद्यार्थिनी धनश्री कुंभार हिचा पुणे येथे भीषण अपघात झाला. रिक्षाने दिलेल्या धडकेमध्ये ती कोमात गेली असून, तिच्यावर शर्थीचे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. जीवरक्षक प्रणालीवर तिला नैसर्गिक श्वासोच्छ्वास मिळवून देण्यासाठी डॉक्टर, नर्सेस प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत, तर तिच्या वैद्यकीय मदतीसाठी आवश्यक असणारा निधी उभारण्यासाठी तिचे पालक धडपडत आहेत. अशा कठीण प्रसंगी फक्त बघत राहील ती शाळा कसली? म्हणूनच लाहोटी कन्या प्रशालेचे सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांनी स्वयंप्रेरणेतून धनश्रीच्या वैद्यकीय मदतीसाठी म्हणून आर्थिक मदत केली. या मदतीतून जमलेली २१ हजार रुपयांची रक्कम प्रशालेच्या मुख्याध्यापिका शर्मिला बायस यांनी कमल कुंभार यांच्याकडे सुपूर्द केली. त्या प्रशालेच्या माजी शिक्षिका असून धनश्रीच्या नातेवाईक आहेत. तिच्या वैद्यकीय मदतीसाठी लवकरच धनश्रीकडे ती रक्कम घेऊन जाणार आहेत.