संतोष पोळची पत्नी पोलिस ठाण्यात

By Admin | Updated: August 20, 2016 23:26 IST2016-08-20T23:25:59+5:302016-08-20T23:26:45+5:30

बातमी ऐकून म्हणे, धक्का बसला!

Santosh Pol's wife is in police station | संतोष पोळची पत्नी पोलिस ठाण्यात

संतोष पोळची पत्नी पोलिस ठाण्यात

सातारा : सिरियल किलर संतोष पोळच्या पत्नीने शनिवारी दुपारी मुंबईहून साताऱ्यात येऊन पोलिसांना जबाब दिला. ‘पतीने खून केल्याचे समजल्यानंतर मला धक्काच बसला. तो काय करायचा, याची मला कसलीही कल्पना नव्हती,’ असेही तिने पोलिसांना सांगितले.संतोष पोळची प्रेयसी ज्योती मांढरे हिला पोलिसांनी अटक केल्यानंतर पोळची पत्नी लहान मुलाला घेऊन मुंबई येथे आपल्या माहेरी गेली होती. त्यामुळे पोलिसांचा संशय तिच्यावर अधिकच बळावला होता. पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधल्यानंतर ‘आपण सहकार्य करू,’ असे पोळच्या पत्नीने पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे शनिवारी दुपारी पोळची पत्नी, तिचे वडील आणि दोन मुले मुंबईहून साताऱ्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी
सुमारे दोन तास तिची चौकशी
केली. ‘पतीने एवढे खून केले असावेत, याचा विश्वासच बसत नाही. टीव्हीवर आणि पेपरमध्ये वाचून हे सर्व मला समजले,’ असे तिने सांगितले आहे. ‘यापुढे चौकशीसाठी बोलावले तर परत येईन,’ असे तिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्
ाी मुलांसमवेत मुंबईला निघून गेली. (प्रतिनिधी)


मेहुणा करतोय ग्रामस्थांना दमदाटी !
संतोष पोळचा मेहुणा सुरेश हगवणे हा धोम ग्रामस्थांना दमदाटी करत आहे. ‘प्रसारमाध्यमांना आणि पोलिसांना कोण माहिती देत आहे. त्याला बघून घेतो,’ अशी तो धमकी देत आहे. त्यामुळे धोम ग्रामस्थांनी शनिवारी रात्री आठच्या सुमारास त्याच्याविरोधात वाई पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावेळी मोठ्या संख्येने धोम ग्रामस्थ पोलिस ठाण्यासमोर जमा झाले होते. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मेहुण्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. - संबंधित बातमी/हॅलो १ वर

Web Title: Santosh Pol's wife is in police station