शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

समर्थ एकांकिका स्पर्धा १७ फेब्रुवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 2:57 PM

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सातारा शाखेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा यावर्षी दि. १७ ते २० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केल्या जाणार असल्याची माहिती शाखेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी दिली.

ठळक मुद्देसमर्थ एकांकिका स्पर्धा १७ फेब्रुवारीलाराज्यभरातील संस्थांचे दर्जेदार सादरीकरण पाहण्याची सातारकरांना संधी

सातारा : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सातारा शाखेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा यावर्षी दि. १७ ते २० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केल्या जाणार असल्याची माहिती शाखेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी दिली.साताऱ्याच्या रंगकर्मींनी एकत्र येऊन स्पर्धेच्या माध्यमातून उभी केलेली ही चळवळ सतराव्या वर्षात पदार्पण करत आहे. दरवर्षी किमान ५० ते ६० संघ प्रयोग करण्याची इच्छा प्रदर्शित करतात; मात्र वेळेअभावी ३० ते २५ संघांनाच सहभाग देता येतो, हा अनुभव लक्षात घेता स्पर्धकांनी शक्य तितक्या लवकर प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन कार्यवाह राजेश मोरे यांनी केले आहे.स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या संघास मानाचा ह्यसमर्थ करंडकह्ण आणि रोख रक्कम व प्रमाणपत्र, द्वितीय संघास रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकास रोख रक्कम पारितोषिक देण्यात येणार आहे. याखेरीज उत्तेजनार्थ एकांकिका, शिस्तबद्ध संघ, नवीन संहितेसाठी, सर्वोत्तम स्थानिक संघास अशी रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

पुरुष आणि स्त्री अभिनय, दिग्दर्शन या विभागांत रोख पारितोषिके देण्यात येतील तर नेपथ्य, प्रकाश, संगीत, रंगभूषा व वेशभूषा या विभागातील पहिल्या तीन क्रमांकांना रोख रुपयांची पारितोषिके देण्यात येतील, असे खजिनदार शेखर कुलकर्णी यांनी सांगितले.स्पर्धकांना अवांतर प्रकाशयोजना, रंगभूषाकार अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येईल. स्पर्धकांनी एकांकिकेच्या तीन प्रती, लेखकाचे संमतीपत्र, डीआरएम क्रमांक, प्रकाशयोजना आराखडा या बाबींची पूर्तता करून प्रवेश निश्चित करावा.

प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी असल्याचे ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम प्रभुणे यांनी सांगितले. प्रेक्षकांना स्पर्धा पाहण्यासाठी नि:शुल्क प्रवेश दिला जाणार आहे. स्पर्धकांना आठ लेव्हल, चार मोडे, दोन स्पॉट, एक डीमर हे साहित्य संयोजकांकडून नि:शुल्क मिळणार आहे, असे मनोज जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Natakनाटकcultureसांस्कृतिकSatara areaसातारा परिसर